बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा आज २५ वा वाढदिवस. जान्हवी कपूर ही दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी आहे. जान्हवीनं ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आजही अनेकदा श्रीदेवी आणि जान्हवी यांच्यात तुलना होताना दिसते. जान्हवी तिच्या आईसारखी दिसते असं नेहमीच बोललं जातं. अनेकदा जान्हवी देखील आईच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. पण काही वर्षांपूर्वी असं काही घडलं होतं की श्रीदेवी यांनी स्वतःच्याच मुलीची सर्वांसमोर खिल्ली उडवली होती.
एका मासिकाकडून आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्रीदेवी यांच्यासोबत मुलगी जान्हवी कपूर सुद्धा होती. यावेळी काही पत्रकारांनी जान्हवीला देखील काही प्रश्न विचारले होते आणि तिनेही मोडक्या तोडक्या हिंदीमध्ये त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली होती. आपल्या मुलीचं मोडकं- तोडकं हिंदी ऐकल्यावर श्रीदेवी यांनी हसू आवरलं नाही. एवढंच नाही तर त्यांनी तिची नक्कल करत तिची खिल्ली देखील उडवली होती.
आणखी वाचा- Video : ‘किती हा अॅटीट्यूड…’ अजय देवगणच्या लेकीचं वागणं पाहून संतापले युजर्स
या पत्रकार परिषदेत काही पत्रकारांनी जान्हवीला तिच्या भविष्याती प्लान बद्दल विचारलं होतं. त्यावर १५ वर्षांची जान्हवी इंग्रजीमध्ये उत्तरं देऊ लागली. पण पत्रकारांनी तिला हिंदीमध्ये बोलायला सांगितलं. त्यावर जान्हवी म्हणाली, ‘हिंदीमध्ये… मला अजूनही नाही माहीत कसं बोलायचं. मी सध्या शाळेत शिकतेय आणि…’ जान्हवीच्या बोलण्यानंतर श्रीदेवी यांनी माइक स्वतःकडे घेत जान्हवीची नक्कल केली होती. ज्यावर उपस्थित पत्रकारांसोबत जान्हवीला देखील हसू आवरेनासं झालं होतं. तसेच हिंदी बोलता येत नाही म्हणून जान्हवीनं देखील माफी मागितली होती.
आणखी वाचा- हटके फॅशनच्या नादात करीना कपूर झाली ट्रोल, युजर्स म्हणाले…
दरम्यान जान्हवी कपूरनं ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. मात्र मुलीच्या पदार्पणाचा चित्रपट पाहण्याआधीच श्रीदेवी स्वर्गवासी झाल्या. या चित्रपटात जान्हवीसोबत अभिनेता इशान खट्टर मुख्य भूमिकेत होता. त्यानंतर जान्हवीनं, ‘रुही’, ‘गुंजन सक्सेना’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आणि या सर्वच चित्रपटात ती अगदी बिनधास्त हिंदी बोलताना दिसली. एवढंच नाही तर ती आता अनेक मुलाखतींमध्येही उत्तम हिंदी बोलताना दिसते.