ज्युनियर एनटीआरचा जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. ‘आरआरआर’मधील दमदार अभिनयामुळे तो गेले काही दिवस सातत्याने चर्चेत आहे. ‘आरआरआर’मध्ये त्याने साकारलेल्या ‘कोमाराम भीम’ या पात्राची सर्वत्र प्रशंसा झाली. प्रेक्षकांसोबतच बॉलिवूडलाही त्याने भुरळ पाडली आहे. त्यातच आता जान्हवी कपूरने ज्युनियर एनटीआरसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे एका मुलाखतीत सांगितले.
याआधी दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट यांनी सुपरस्टार ज्युनियर एनटीआरसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता या यादीत जान्हवी कपूरचे नाव समाविष्ट झाले आहे. जान्हवीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला.
आणखी वाचा – राजकुमार रावने खरेदी केलं जान्हवी कपूरचं आलिशान घर, अभिनेत्रीला झाला ‘इतक्या’ कोटींचा नफा
तू ज्युनियर एनटीआरसोबत चित्रपट करत आहेस का? असा प्रश्न विचारला असता जान्हवी म्हणाली, “मी कोणताही दाक्षिणात्य चित्रपट करण्यास खूप उत्सुक आहे, एनटीआर सर या क्षेत्रातले दिग्गज आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणे, माझ्यासाठी मोलाचे असेल. दुर्दैवाने अजून ती संधी मला मिळाली नाही. मी त्या संधीची वाट पाहत आहे आणि मला ती मिळेल अशी आशा आहे.”
ज्युनियर एनटीआर आगामी काळात जनता गॅरेजचे दिग्दर्शक कोरटाला सिवा दिग्दर्शित ‘NTR30’ मध्ये झळकणार आहे. त्यासोबतच तो ‘KGF’ दिग्दर्शक प्रशांत नील दिग्दर्शित ‘NTR31’ या चित्रपटाद्वारेही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक करत असल्याने त्याचे चाहते फार उत्सुक असल्याचे दिसत आहे. तसेच या चित्रपटात काय नवीन असणार, हे पाहण्यासही प्रेक्षक उत्सुक आहेत.
आणखी वाचा – “यासाठी कोणाला शिक्षा…” रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर जान्हवी कपूरची प्रतिक्रिया
नुकताच जान्हवीचा ‘गुड लक जेरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कोलामावु कोकिला’ या तामिळ चित्रपटाचा हा रिमेक आहे.