नुकत्याच पार पडलेल्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी (IIFA) पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडच्या दिग्गज कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. यादरम्यानचे कलाकारांचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सुप्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली होती. अभिनेत्री व सुत्रसंचालक आरती खेत्रपालबरोबर बोनी कपूर यांनी काढलेला फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
बोनी कपूर यांनी सुत्रसंचालक आरती खेत्रपालबरोबर फोटो काढत असताना तिचा हात पकडला. यावरुनच त्यांना ट्रोल करण्यास नेटकऱ्यांनी सुरुवात केली. या फोटोमध्ये बोनी कपूर यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान केला असल्याचं दिसत आहे. तसेच आरतीने थाय वन पीस ड्रेस परिधान केला आहे.
जेव्हा बोनी कपूर व आरतीने हा फोटो काढला तेव्हा बॉलिवूडमधील इतर मंडळी देखील तिथे उपस्थित होती. या व्हायरल फोटोमुळे बोनी कपूर सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहेत. विरल भयानीने त्यांचा हा फोटो त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या फोटोवर एक युजरने म्हटलं आहे की, काका कपूर ही तर तुमच्या मुलीच्या वयाची आहे. तर दुसऱ्या युजरने म्हटलं की, तू नेमका कोणता ड्रेस घातला आहेस हेच कळत नाही.
आणखी वाचा – ‘धाकड’च्या अपयशानंतर कंगना रणौतचं एक पाऊल मागे?, नव्या चित्रपटाबाबत निर्मात्यांचं स्पष्टीकरण
बोनी कपूर यांचं वय पाहता त्यांनी अशा प्रकारचा फोटो काढणं चुकीचं आहे असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र बोनी कपूर यांनी ट्रोलर्सकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं असल्याचं पाहायला मिळत आहे. आयफा पुरस्कार दरम्यानचे कलाकारांचे ग्लॅमरस लूकमधील बरेच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेले दिसत आहेत.