भारतीय सुरक्षा दलातील कोणत्याही तुकडीचा अनेकांनाच अभिमान वाटतो. टिव्हीवर बऱ्याचदा सैन्यदलाचे शिस्तबद्ध संचलन सुरु असताना ‘आपणही त्या ठिकाणी देशाच्या सेवेसाठी तत्पर असतो तर…’ असा विचारही अनेकांच्या मनात घर करुन जातो. त्यातही सैन्यदलात सहभागी होणाऱ्या महिलांचे अनेकांनाच कौतुक वाटते. अशाच काही कर्तबगार महिलांच्या यादीतील एक नाव म्हणजे गुंजन सक्सेना. १८ वर्षांपूर्वी झालेल्या कारगिल युद्धात महत्त्वाचे योगदान देणाऱ्यांमध्ये गुंजन यांचे नावही तितक्याच अभिमानाने घेतले जाते. लढवैय्या फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये जान्हवी कपूर गुंजन यांची भूमिका साकारत असून तिचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

निर्माता दिग्दर्शक करण जोहर गुंजन यांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर आणण्यासाठी सज्ज झाला आहे. कारगिल युद्धात गुंजन फ्लाईट लेफ्टनंट श्रीविद्या राजनसोबत लढाऊ विमान उडवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्यदलाकडून भारतीय सैनिकांवर निशाणा साधण्यात येत होता त्या भागातूनच गुंजन यांनी लढाऊ विमान उडवत सैन्यदलातील जवानांना सुरक्षितरित्या बाहेर काढले होते. त्यामुळे त्यांच्या साहसाची प्रशंसा करावी तितकी कमीच आहे.

https://www.instagram.com/p/Br1lL_eg3Bc/

‘तख्त’ या चित्रपटापूर्वीच जान्हवीने या बायोपिकसाठी तयारी सुरू केली आहे. भारतीय वायूदल आणि त्याच्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी शिकून घेण्यासाठी जान्हवी मेहनत घेत आहे. यासाठी तिने काही महिन्यांपूर्वी गुंजन यांची प्रत्यक्ष भेटसुद्धा घेतली होती. या बायोपिकमध्ये जान्हवीसोबत अभिनेता दलकर सलमान झळकणार असल्याचं कळतंय. गुंजन यांची ही शौर्यगाथा आणि त्यांच्या प्रवास सर्वांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी करणने स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. या चित्रपटाबद्दल अनेकांना उत्सुकता आहे.

Story img Loader