बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच जान्हवीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे जान्हवी सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे.

जान्हवीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे जान्हवीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. या व्हिडीओत जान्हवीच्या हाताला लागलं असून काही कॅमेरामॅन तिला त्या विषयी विचारत असताना तिने त्यांच्याकडे दुर्लेक्ष केलं. त्यानंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे.

आणखी वाचा : ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीवर कतरिनाचा भाऊ फिदा! पोस्ट शेअर करत म्हणाला…

आणखी वाचा : विक्रम गोखले साकारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

जान्हवीला ट्रोल करत एक नेटकरी म्हणाला, “कसला गर्व आहे तिला.” दुसरा नेटकरी म्हणाला, “गर्व तर बघा जशी मोठी स्टार आहे.” तिसरा नेटकरी म्हणाला, “तिने तर रिप्लायही दिला नाही.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “बॉयफ्रेंडने मारलं असणार म्हणून हाताला दुखापत झाली, त्याच्यामुळेच टी-शर्टवरून मेसेज देते.” दुसरा नेटकरी म्हणाला, “एवढा गर्व पण चांगला नाही.”

Story img Loader