Devara Box Office Collection day 1: ज्युनिअर एनटीआर, जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि सैफ अली खान यांचा मुख्य भूमिका असलेला ‘देवरा पार्ट १’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे रिलीज पूर्वा अॅडव्हान्स बूकिंग जबरदस्त झाले होते. त्यामुळे या चित्रपटाच्या ओपनिंगकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली, त्याची आकडेवारी समोर आली आहे.

‘देवरा’ चित्रपटातून जान्हवी कपूर व सैफ अली खान (Saif Ali Khan) यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केले. तर, ‘RRR’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर दोन वर्षांनी ज्युनिअर एनटीआर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ होती. अखेर चित्रपट प्रदर्शित झाला आणि चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली.

Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Pushpa 2 Movie News
Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ हजार कोटींच्या क्लबमध्ये, इतकी बक्कळ कमाई करणारे आणखी सहा चित्रपट कुठले?
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”
cinema hall Ulhasnagar, Ulhasnagar Parking ,
उल्हासनगरात चित्रपटगृहाशेजारील रहिवाशांची कोंडी, प्रेक्षकसंख्या वाढल्याने रहिवासी क्षेत्रात पार्कींग
Paaru
Video: पारू आदित्यला नवरा मानत असल्याचे सत्य श्रीकांतसमोर येणार? पाहा ‘पारू’ मालिकेचा नवीन प्रोमो
Pushpa 2 Box Office Collection Day 3
Pushpa 2 : ‘पुष्पा’ने तिसऱ्या दिवशी कमावले तब्बल ‘इतके’ कोटी! शाहरुखच्या ‘जवान’ला टाकलं मागे, आतापर्यंतची कमाई किती?
Bollywood actress tripti dimri and shahid Kapoor will be seeon together in Vishal Bhardwaj's action film Arjun Ustra
रणबीर कपूर, विकी कौशलनंतर तृप्ती डिमरी ‘या’ चॉकलेट बॉयबरोबर रोमान्स करताना दिसणार; विशाल भारद्वाजच्या ‘अर्जुन उस्तरा’मध्ये झळकणार ही नवी जोडी

हेही वाचा – ‘धर्मवीर २’ ची दमदार सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी; ठरला यंदाचा सर्वाधिक ओपनिंग करणारा मराठी सिनेमा

‘देवरा पार्ट १’ ची पहिल्या दिवसाची कमाई

सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी ७७ कोटींची कमाई केली आहे. त्यापैकी ६८.६ कोटी रुपये तेलुगू भाषेत कमावले. तर या चित्रपटाने हिंदीमध्ये सात कोटी रुपये कमावले. कन्नड व मल्याळममध्ये ०.३ कोटी, तर तमिळमध्ये चित्रपटाने ०.८ कोटी रुपयांची कमाई केली.

हेही वाचा – Devara Public Review: प्रेक्षकांना कसा वाटला ‘देवरा: पार्ट १’चित्रपट? प्रतिक्रिया देत म्हणाले, “दिग्दर्शन खूपच….”

प्री-सेल्समध्ये, ‘देवरा’ ने प्रीमियरसह भारतात ४५ कोटी रुपये आणि परदेशात ३० कोटी रुपयांची कमाई केली. ‘देवरा’ हा प्रभासच्या ‘कल्की 2898 एडी’ नंतर २०२४ मधील दुसरा सर्वात मोठा ओपनिंग करणारा सिनेमा ठरला आहे. कल्कीने भारतात ९५ कोटी आणि जगभरात १९१.५ कोटींची ओपनिंग केली होती.

हेही वाचा – ‘नवरा माझा नवसाचा २’ने सातव्या दिवशी कमावले एक कोटी; एका आठवड्याचे कलेक्शन किती? जाणून घ्या

२७ सप्टेंबर रोजी देशभरात इतर कोणतेही मोठे चित्रपट रिलीज झालेले नाहीत. त्यामुळे वीकेंडला या चित्रपटाच्या कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ‘देवरा पार्ट १’ सिनेमात सैफ अली खान खलनायकाच्या भूमिकेत आहे. कोराताला शिवा लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात ज्युनियर एनटीआर दुहेरी भूमिकेत असून मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे, प्रकाश राज, श्रीकांत, शाइन टॉम चाको आणि नारायण मुख्य भूमिकेत आहे.

Story img Loader