Devara Part 1 Public Review: जान्हवी कपूर, ज्युनिअर एनटीआर व सैफ अली खान यांचा ‘देवरा: पार्ट १’ चित्रपट आज (२७ सप्टेंबर रोजी) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातून जान्हवीने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. ज्युनिअर एनटीआरचा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला ते जाणून घेऊयात.

तेलुगू सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरच्या चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडला आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. ज्यांनी आज हा चित्रपट पाहिला ते त्यांना चित्रपट कसा वाटला, याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करून सांगत आहेत. अशाच काही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहुयात.

Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
maharashtra vidhan sabha mpsc
MPSC मंत्र : महाराष्ट्र विधानसभा; पारंपरिक आणि तथ्यात्मक प्रश्न
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

Bigg Boss Marathi: निक्कीच्या आईच्या वक्तव्यावर अरबाज पटेलची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “माझा साखरपुडा…”

काही युजर्सनी देवरा ब्लॉकबस्टर चित्रपट असल्याचं म्हटलं आहे. जान्हवी व ज्युनिअर एनटीआरच्या चाहत्यांना चित्रपट फारच आवडला आहे.

देवरा हा लोकांचे मनोरंजन करणारा चित्रपट आहे, असं एका युजरने लिहिलं आहे.

चित्रपटात तारकचे काम खूप चांगले आहे. गाणी चांगली आहे, पण दिग्दर्शन खूपच वाईट आहे. कथेबद्दल टीमला जास्तच आत्मविश्वास दिसत आहे. हा चित्रपट सामान्य प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणू शकणार नाही, अशी एक्स पोस्ट एका युजरने केली आहे.

चित्रपटाची सुरुवात जबरदस्त आहे, पण इंटर्व्हलनंतर तो आणखी चांगला होऊ शकला असता. ज्युनिअर एनटीआरने उत्तम काम केलं आहे, असं आणखी एका युजरने पोस्टमध्ये लिहिलं आहे.

काही प्रेक्षकांना हा चित्रपट ब्लॉकबस्टर वाटत आहे.


‘देवरा पार्ट १’ सिनेमातून जान्हवी कपूर आणि सैफ अली खान यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. सैफ अली खानने ‘तान्हाजी’ आणि ‘आदिपुरूष’ या सिनेमांनंतर ‘देवरा पार्ट १’मध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. कोराताला शिवा लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात ज्युनियर एनटीआर दुहेरी भूमिकेत असून मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे, प्रकाश राज, श्रीकांत, शाइन टॉम चाको आणि नारायण मुख्य भूमिकेत आहे.

Story img Loader