‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी चित्रपटातील डायलॉगवर काही व्हिडीओ शेअर करत आहेत. गेल्या आठवड्यात आलिया भट्टने करीनाचा चित्रपटातला कॉलेजमधला फेमस सीन रीक्रिएट केला होता. तसाच एक व्हिडीओ आता जान्हवी कपूरने शेअर केला आहे. जान्हवीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
जान्हवीने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत जान्हवीने पिवळ्या रंगाचा प्रिंटेड ड्रेस परिधान केला आहे. या व्हिडीओत जान्हवी आरश्यात पाहून स्वत: ला बघत करीनाचा डायलॉग बोलते. जान्हवी बोलते “तुझ्यात एवढी हिंमत्त, एवढी सुंदर दिसण्याचा तुला हक्क नाही. हे बरोबर नाही.” जान्हवीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा : लग्नाला होकार देण्यापूर्वी कतरिनाने विकीसमोर ठेवली होती ‘ही’ एक अट
आणखी वाचा : ‘काय विचित्र प्रकार आहे…’, व्हिडीओत पॅन्टचं बटन बंद केल्यामुळे उर्फी जावेद ट्रोल
दरम्यान, या आधी चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्याने काजोलने एक व्हिडीओ शेअर केला होता. काजोलने तिचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्यासोबत करण जोहरनेही चित्रपटाच BTS व्हिडीओ शेअर केला होता.