कोराताला शिवा लिखित, दिग्दर्शित ‘देवरा: पार्ट १’ चित्रपटाची चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. अखेर २७ सप्टेंबरला हा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर ( Janhvi Kapoor ), सैफ अली खान अशी तगडी स्टारकास्ट ‘देवरा: पार्ट १’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ऑगस्ट महिन्यात या चित्रपटातील दुसरं गाणं प्रदर्शित झालं होतं. ‘धीर-धीरे’ असं त्या गाण्याचं नाव असून यामधील ज्युनियर एनटीआर व जान्हवीच्या केमिस्ट्रीने सगळ्यांना भुरळ पाडली होती. त्यानंतर आता ‘देवरा: पार्ट १’ चित्रपटातील नव्या गाण्यातून दोघांनी आपल्या जबरदस्त डान्सने सगळ्यांना वेड लावलं आहे. एवढंच नव्हे तर जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड देखील डान्स पाहून भारावून गेला आहे.

काही दिवसांपूर्वीच ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरच्या ( Janhvi Kapoor ) ‘देवरा: पार्ट १’ चित्रपटातील तिसरं गाणं ‘दावूदी’ प्रदर्शित झालं. या गाण्यात ज्युनियर एनटीआर आणि जान्हवीने जबरदस्त डान्स केला आहे. त्यामुळे ‘दावूदी’ गाणं सध्या चांगलाच चर्चेत आलं आहे. तसंच युट्यूबवर ट्रेंड होतं आहे. तेलुगू आणि हिंदी भाषेत ‘दावूदी’ गाणं प्रदर्शित झालं असून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्यातील ज्युनियर एनटीआर, जान्हवीच्या एनर्जेटिक परफॉर्मन्सने सगळ्यांचं अधिक लक्ष वेधून घेतलं आहे. यासंदर्भात जान्हवीचा बॉयफ्रेंड शिखर पहारियाने खास स्टोरी शेअर केली होती; जी सध्या व्हायरल होतं आहे.

Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Trending video boy from village singing song of nathicha nakhara goosebumps came on people after listing his song viral video
“नथीचा नखरा नऊवारी साडी” शाळकरी मुलाच्या गाण्यानं अख्ख्या महाराष्ट्राला लावलं वेड; सूर असा की अंगावर येतील शहारे, VIDEO पाहाच
Sakhi Gokhale and suvrat joshi dance on shahrukh khan lutt putt gaya song
Video: सखी गोखले-सुव्रत जोशीचा पहाटे २ वाजता शाहरुख खानच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
Navri MIle Hitlarla
Video : “तू या लूकमध्येसुद्धा…”, सुनांचा डाव फसणार, लीलाचा धांदरटपणा एजेंना आवडणार; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “एक नंबर एजे”
Savlyachi Janu Savli
Video: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांचा ‘कोंबडी पळाली’ गाण्यावर भन्नाट डान्स; नेटकरी म्हणाले, “तुम्ही किती…”
Navri Mile Hitlarla
Video : ‘नवरी मिळे हिटलरला’मधील ‘या’ जोडप्याने ‘हैला हैला’ गाण्यावर धरला ठेका; नेटकरी कौतुक करीत म्हणाले, “हृतिक आणि प्रीती…”
tharla tar mag fame sayali kusum and madhubhau dances on bollywood song
फिर भी ना मिला सजना…; ‘ठरलं तर मग’ फेम सायली, कुसुम अन् मधुभाऊंचा जबरदस्त डान्स! ‘ते’ गाणं ऐकून नेटकरी म्हणाले…

हेही वाचा – “कुठेतरी फेक वाटतंय”, निक्कीबरोबर असलेल्या रिलेशनशिपवर अरबाज पटेलच्या वडिलांचं भाष्य, म्हणाले…

शिखर पहारियाने इन्स्टाग्राम स्टोरीवर जान्हवीच्या ( Janhvi Kapoor ) नव्या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत शिखरने लिहिलं आहे, “वाव..वाव…वाव…अप्सरा हो तुम या कोई परी.” शिखरची ही इन्स्टाग्राम स्टोरी चांगलीच चर्चेत आली आहे.

हेही वाचा – Bigg Boss Marathi : ‘ए’ टीममध्ये फूट पडल्यामुळे अरबाज पटेलचे वडील चिंतेत, म्हणाले, “वैभव आणि जान्हवीबरोबर…”

दरम्यान, ‘देवरा: पार्ट १’ चित्रपटात ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर ( Janhvi Kapoor ), सैफ अली खानसह श्रुती मराठे, प्रकाश राज, श्रीकांत, शाइन टॉम चाको आणि नारायण महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. माहितीनुसार ‘देवरा: पार्ट १’ चित्रपटावर ३०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून जान्हवी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे. त्यामुळे आता जान्हवी कपूरचा हा पदार्पणाचा चित्रपट बॉक्सवर बक्कळ कमाई करतो की नाही? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader