बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. दरम्यान, सध्या जान्हवीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत जान्हवी तिचे वडील बोनी कपूर यांना ओरडताना दिसत आहे. एवढंच नाही तर जान्हवी फोटोग्राफर्सवर पण संतापली आहे.
जान्हवीचा हा व्हिडीओ बॉलिवूड पेप या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत जान्हवी तिचे वडील बोनी कपूर यांच्यासोबत दिसत आहे. यावेळी फोटोग्राफर्स जान्हवी आणि बोनी कपूर यांना मास्क काढायला सांगतात. बोनी कपूर यांनी मास्क काढायल्यानंतर जान्हवी त्यांना ओरडते आणि म्हणते “मास्क काढू नका.” एवढंच नाही तर तिच्या हाताने ती त्यांना मास्क घालू लागली. तर दुसरीकडे फोटोग्राफर्स त्यांना बोलताता “काही होणार नाही.” हे ऐकताच जान्हवी बोलते
“उगीच असा चुकीचा सल्ला देऊ नका.”
जान्हवीने ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर जान्हवी ‘रुही’ आणि ‘गुंजन सक्सेना’ या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. लवकरच जान्हवी ‘गुडलक’, ‘तख्त’, ‘दोस्ताना २’ आणि ‘रणभूमि’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.