बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच तिच्या लूक्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. तिने अनेकदा जिमच्या बाहेर किंवा कोणत्या ना कोणत्या इव्हेंटमध्ये पाहिलं जातं. प्रत्येक वेळी जान्हवीचा लूक चर्चेत असतो आणि चाहतेही तिच्या लूक्सना पसंती देताना दिसतात. पण काही वेळा मात्र फॅशनच्या नादात तिला सोशल मीडियावर ट्रोलही व्हावं लागतं. आताही तिचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय ज्यातील तिच्या कपड्यांमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
सोशल मीडियावर जान्हवी कपूरचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती निळ्या रंगाची डेनिम आणि पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसत आहे. या लूकमध्ये ती खूपच कूल दिसत आहे. पण यामध्ये जान्हवीच्या शर्टची काही बटन्स उघडी असल्याचं दिसत आहे. ज्यामुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलंच सुनावलं आहे. या व्हिडीओमुळेच जान्हवी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
आणखी वाचा-सारा अली खानने सुरक्षारक्षकाला चुकीच्या पद्धतीने केला स्पर्श? व्हायरल व्हिडीओ चर्चेत
जान्हवी कपूरच्या या व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहिलं, “शर्टचं बटन लावायला विसरलीस का?” तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं, “एअरपोर्ट म्हणजे जिम किंवा चित्रपटाची पार्टी तर नाही ना?” याशिवाय आणखी एका युजरने कमेंट केलीय, “जेव्हा मला शर्ट टाइट होतं तेव्हा मी असंच करते.” अर्थात जान्हवी नेटकऱ्यांनी ट्रोल केलं असलं तरीही काही युजर्सनी मात्र तिच्या या लूकचं कौतुकही केलं आहे.
दरम्यान जान्हवी कपूरच्या कामाबद्दल बोलायचं तर ती अखेरची ‘गुड लक जेरी’ चित्रपटात दिसली होती. हा तिचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं कौतुकही झालं होतं. आगामी काळात ती अभिनेता राजकुमार रावसह ‘मिस्टर अँड मिसेस माही’मध्ये दिसणार आहे. याआधी दोघांनीही ‘रूही’ चित्रपटात एकत्र काम केलं आहे.