भारतीय अभिनेत्यांचे चाहते आज देशभरात नव्हे तर जगभरात आहेत. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान सलमान खान यांचे चाहते परदेशातदेखी आहेत. आमिरच्या चित्रपटांना चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर बघितले जातात. त्याचपद्धतीने दाक्षिणात्य अभिनेत्यांचेदेखील जगभरात चाहते आहेत. प्रामुख्याने आशिया खंडात हे प्रमाण जास्त आहे. नुकतीच आर आर आर चित्रपटातील कलाकारांची फौज चित्रपटाची फौज जपान देशात गेली आहे.
एस एस राजामौली यांच्या बाहुबलीने देशातच नव्हे तर परदेशातील प्रेक्षकांची मनं जिंकली होती. अमेरिकेनंतर आता या चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी जपानला गेले आहेत. या दरम्यान दाक्षिणात्य स्टार ज्युनिअर एनटीआरने तिकडच्या चाहत्यांची भेट घेतली. तो जेव्हा चाहत्यांना भेटायला गेला तेव्हा चाहत्यांनी त्याच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली. आपल्या लाडक्या स्टारला बघितल्यावर काहींना अश्रू अनावर झाले. काही चाहत्यांनी त्याची सही घेतली. सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे.
“अमिताभ बच्चन माझ्यावर…. “; अनुपम खेर यांनी पत्रकार परिषदेत केला खुलासा
अमेरिकेप्रमाणेच जपानमध्येसुद्धा या चित्रपटाची चांगलीच हवा आहे. जपानी लोकांनी या चित्रपटाचं मनापासून स्वागत केलं आहे. २१ ऑक्टोबरला हा चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित झाला आहे. या कलाकारांनी आपल्या परिवारालादेखील प्रमोशनसाठी जपानला नेले आहे. जपानच्या रस्त्यावर फिरतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
राजामौली यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केला असून राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरसारखे सुपरस्टार या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. आलिया भट, अजय देवगण तसेच आपले मराठमोळे मकरंद देशपांडेसारखे मातब्बर कलाकारही या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसले होते. प्रेक्षकांनी ‘बाहुबली’इतकं प्रेम या चित्रपटावर जरी केलं नसलं तरी साऱ्या जगाने या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.