प्रसिध्द लेखक आणि गितकार जावेद अख्तर यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पाठीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयार दाखल करण्यात आले. अलिकडेच दिल्लीतील एका संगीत महोत्सवात ते निदर्शनास पडले होते. पाठ दुखीचा त्रास असतांना देखील, आपल्या संगीताच्या आवडीमुळे त्यांनी या महोत्सवात उपस्थिती लावली होती. परंतु, संगीत समारोह संपल्यावर त्यांनी पाठीत मोठ्याप्रमाणावर दुखत असल्याची तक्रार केली. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी पत्नी शबाना आझमी त्यांच्याबरोबर होती. डॉक्टरांकडून त्यांच्यावर तीन दिवस उपचार करण्यात आल्यानंतर, आता त्यांना काही दिवसातच घरी परत जाण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Story img Loader