सलीम-जावेद या जोडीने भारतीय चित्रपटसृष्टीला एकाहून एक असे सरस चित्रपट दिले. कालांतराने ही जोडी वेगळी झाली, पण आजही प्रेक्षक त्यांची आठवण काढतात. त्यापैकी जावेद अख्तर हे आजही सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. वेगवेगळ्या चित्रपटांसाठी ते गाणी लिहितात. नुकतंच जावेद अख्तर यांनी लाहोर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात हजेरी लावली.
हा कार्यक्रम उर्दू कवी फैज अहमद फैज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जावेद अख्तर यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याबद्दल भाष्य केलं आहे. एकूणच भारतीय लोकांच्या मनातील असलेली या हल्ल्याबद्दलची खदखद आणि पाकिस्तानचा यात असलेलं सहभाग याबद्दलही जावेद अख्तर यांनी स्पष्टपणे भाष्य केलं आहे.
“सोनू निगमला भारतातील कायदा…” गायकाच्या धक्काबुक्कीप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्याची प्रतिक्रिया चर्चेत
त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.याविषयी जावेद अख्तर म्हणाले, “आपण एकमेकांना दोष देणं थांबवलं पाहिजे, त्यामुळे कोणतीही समस्या सुटणार नाही. एकूणच सध्या जे वातावरण तापलं आहे ते कमी व्हायला पाहिजे. आम्ही मुंबईकर आहोत, आम्ही पाहिलं आहे तेव्हा मुंबईवर कशापद्धतीने हल्ला झाला होता. ती लोकं नॉर्वे किंवा इजिप्तमधून आलेले नव्हते. ही लोक अजूनही तुमच्या देशात मोकाट फिरत आहेत आणि ही खदखद एखाद्या भारतीयाच्या मनात असेल तर त्याचं तुम्ही वाईट वाटून घ्यायला नको.”
इतकंच नाही तर जावेद अख्तर यांनी खासकरून नमूद केलं की भारतात मेहंदी हसन, नुसरत फतेह अली खानसारख्या पाकिस्तानी कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले, पण आजवर कधीच पाकिस्तानमध्ये लता मंगेशकर यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला नाही. ही खंतसुद्धा त्यांनी व्यक्त केली. याआधीसुद्धा जावेद अख्तर यांच्या पाकिस्तान भेटीबद्दल बऱ्याच चर्चा झाल्या आहेत, टीका झाली आहे. यावेळी मात्र त्यांनी तिथे जाऊन उपस्थित केलेल्या मुद्द्यांचं कौतुक होताना दिसत आहे.