अभिनेत्री आलिया भटचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘हायवे’ चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेत्री शबाना आझमी आलियाच्या निवासस्थानी तिला शुभेच्छा देण्यासाठी दाखल झाल्या. यावेळी त्यांनी आलियाच्या अभिनयाची प्रशंसा केली आणि भावी करिअरसाठी शुभेच्छा दिल्या. हायवे चित्रपटातील आलियाचे काम पाहून बॉलीवूडमध्ये चक्क पाचवेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱया शबाना आझमी यांनी आलियाच माझ्या अभिनयाची वारसदार असल्याचे म्हटले.
याआधी आलिया भटचे वडिल महेश भट यांनी हायवे चित्रपटातील आलियाच्या भूमिकेला शबाना आझमी यांच्या प्रसिद्ध ‘अर्थ’ चित्रपटातील भूमिकेशी तुलना केली होती. यावर शबाना आझमी यांनीही सहमती दर्शविली आणि माझ्या अभिनयाची आलियाच खरी वासरदार असल्याची स्तुतीसुमनांची पोचपावती आलियाला देऊ केली.
शबाना आझमी म्हणतात की, ‘हायवे’ चित्रपट पाहिल्यानंतर मी आणि जावेद त्वरित आलियाच्या निवासस्थानी गेलो व तिला शुभेच्छा दिल्या. चित्रपटातील तिच्या अभिनयाचा मला अभिमान आहे. असेही त्या म्हणाल्या.  

Story img Loader