बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरूख खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. शाहरूख सोबत प्रत्येकाला काम करण्याची इच्छा असते कारण तो प्रत्येक कलाकाराचा आदर करतो. मात्र, एका मुलाखतीत बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री जया बच्चन यांनी शाहरूखला कानशिलेत लगावायची असल्याचे म्हटले होते. या मागे एक मोठ कारण आहे.

शाहरूखने आता पर्यंत बॉलिवूड मधील अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. त्यापैकी एक म्हणजे विश्वसुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन. या दोघांनी अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. ऐश्वर्याने शाहरूख सोबत काम केलेले सलमान खानला आवडत नव्हते. त्यामुळे एकदा चित्रपटाच्या सेटवर जाऊन सलमानने शाहरूखला खूप सुनावले होते. मग, ऐश्वर्याने तर तो चित्रपट केलाच नाही मात्र, शाहरूख पण तिथेच थांबला नाही तो देखील ऐश्वर्याबद्दल खूप काही बोलला.  शाहरूखचे बोलणे ऐकल्यानंतर ऐश्वर्याची सासू जया बच्चन यांना खूप राग आला होता. यामुळेच त्यांना शाहरूखला कानशिलात लगावाची असल्याचे जया बच्चन म्हणाल्या होत्या.

‘पीपल्स मॅग्झिन’ला दिलेल्या मुलाखतीत जया बच्चन यांनी शाहरूखला कानशिनेत लगावण्याच्या गोष्टीवर वक्तव्य केलं आहे. “हा मी असं केलं असतं. खरंतर त्याच्याशी बोलायला मला अजून जमलं नाही आहे. या भांडणावर मी लवकरच त्याच्याशी बोलणार आहे. मी त्याला तसचं मारलं असतं जसं मी माझ्या मुलाला मारलं असतं. माझं आणि शाहरूखचं नातं खूप चांगल आहे.”

‘अमर उजाला’ने दिलेल्या वृत्तानुसार, ही गोष्ट इथेच संपली नाही तर, शाहरूखचा ‘हॅपी न्युइयर’ प्रदर्शित झाल्यानंतर जया बच्चन या म्हणाल्या होत्या की “हा चित्रपट खूप खराब आहे. या चित्रपटात माझा मुलगा अभिषेक बच्चन नसता तर हा चित्रपट मी कधीच पाहिला नसता.”

Story img Loader