तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि भारतीय अभिनेत्री जयललिता या त्यांच्या पिढीतील सर्वात यशस्वी तमिळ अभिनेत्रींपैकी एक होत्या. सिनेमांमध्ये काम करून त्यांनी खूप संपत्ती कमावली. बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या जयललिता यांनी वयाच्या ३१ व्या वर्षी चित्रपटातून निवृत्ती घेतली होती. १९९७ मध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या शिखरावर असताना, अधिकार्‍यांनी जयललिता यांच्या चेन्नईतील पोस गार्डन निवासस्थानावर छापा टाकला होता. या छाप्यात त्यांची संपत्ती उघडकीस आली होती. ज्यात १०,५०० साड्या, ७५० शूज व चप्पल, ९१ घड्याळे, तसेच ८०० किलो चांदी आणि २८ किलो सोन्याचा समावेश होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कडाक्याची थंडी, ४७ रिटेक अन्…, करिश्मा कपूरने सांगितला ‘त्या’ Kiss चा किस्सा

२०१६ मध्ये जयललिता यांच्या मालमत्तेबदल केलेल्या एका तपासणीत त्यांचे १२५० किलो चांदी आणि २१ किलो सोनं सापडलं होतं. अभिनेत्री ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या जयललिता यांच्याकडे ४२ कोटी रुपयांची कायदेशीर मालमत्ता तसेच आठ कार होत्या. त्यावेळी जयललिता यांची एकूण संपत्ती ९०० कोटी रुपये होती, जी त्यांनी घोषित केलेल्या १८८ कोटी रुपयांपेक्षा खूपच जास्त असल्याचा दावा अहवालात करण्यात आला होता.

“मी आणि काजोलने किसिंग सीन केला तेव्हा अजय देवगण…”, ‘द : ट्रायल’ फेम अभिनेत्याचा खुलासा

जयराम जयललिता यांचा जन्म १९४८ मध्ये तत्कालीन म्हैसूर राज्यातील म्हणजेच कर्नाटकातील मांड्या इथे झाला होता. त्यांनी १९६१ मध्ये अभिनेत्री म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्या कन्नड भाषेतील चित्रपट श्री शैला महात्मे (१९६१) मध्ये बालकलाकार म्हणून दिसल्या होत्या. चित्रपट आणि नाटकांमधील लहान भूमिकांनंतर त्यांनी १९६० मध्यापर्यंत तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केले.

“…भारतीय म्हणणं सोडून द्या”, रेणुका शहाणेंची मणिपूर घटनेवर प्रतिक्रिया; बॉलीवूड अभिनेत्रींनी व्यक्त केला संताप

१९६८ मध्ये जयललिता बॉलीवूड चित्रपट ‘इज्जत’मध्ये धर्मेंद्र यांच्याबरोबर दिसल्या होत्या. त्यांनी एनटी रामाराव, अक्किनेनी नागेश्वर राव, जयशंकर आणि एमजी रामचंद्रन यांच्यासह त्या काळातील सर्वात यशस्वी अभिनेत्यांसोबत काम केलं होतं. त्या ७० च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्री होत्या, पण १९८० मध्ये त्यांनी अभिनय सोडून राजकारणात प्रवेश केला. १९९१ ते २०१७ दरम्यान त्या पाच वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. डिसेंबर २०१६ मध्ये वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले तेव्हा त्या तत्कालीन मुख्यमंत्री होत्या.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayalalithaa 900 crore property gold silver ornaments watches know details hrc
Show comments