सोनी वाहिनीवरील बहुचर्चित ‘इतना करो ना मुझे प्यार’ या मालिकेच्या चित्रीकरण सेटवर जाऊन अभिनेते जितेंद्र यांनी या मालिकेतील अभिनेत्री पल्लवी कुलकर्णीला सरप्राईज दिले. पल्लवी कुलकर्णी या मालिकेमध्ये रागिनी नावाचे पात्र साकारते. नित्यनेमाने सेटवर चित्रीकरणाची तयारी सुरू असताना तुम्हाला जितेंद्रजी भेटण्यास आले असल्याचे सांगण्यात आल्यावर पल्लवी काही क्षण स्तब्धच झाली. सुरूवातीला तर तिला यावर विश्वासच बसेना. त्यानंतर खुद्द जीतेंद्र समोर उभे ठाकल्यानंतर तिला सुखद धक्का बसला. पल्लवी म्हणाली की, “नेहमीप्रमाणे मी व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसून चित्रीकरणाची तयारी करत बसले होते. त्यानंतर जितेंद्रजी सेटवर तुमची वाट पाहत असल्याचे सांगण्यात आले. सुरूवातील मला काही कळेनाच पण, नंतर सेटवर गेल्यावर जितेंद्र यांना समोर पाहिले आणि त्यांनी शुभेच्छा देऊन माझ्या कामाचे कौतुक केले. हा क्षण माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय ठरणारा आहे.”