लंडनस्थित अब्जाधीश संजय हिंदुजा आणि अनू महंतानी यांचा शाही थाटात लग्नसोहळा पार पडला. उदयपूर पॅलेसमध्ये झालेल्या या शाही विवाहसोळ्याला पॉप स्टार जेनिफर लोपेझ आणि पुसीकॅट डॉलमधील निकोल शेरझिंगर यांच्या सादरीकरणाने चारचाँद लागले.
पहिल्यांदाच भारत दौ-यावर आलेल्या जेनिफरसह तिचा प्रियकर कास्पर स्मार्टही होता. या शाही लग्नाला शिल्पा शेट्टी ही पती राज कुंद्रासह उपस्थित होती. जेनिफरच्या सादरीकरणाने थक्क झालेल्या राज कुंद्राने ट्विट केले होते.

बिझनेस टायकून आणि हॉलिवूड-बॉलिवूडमधील अनेक दिग्गक मंडळी या लग्नात सहभागी झाले होती. सोहेल खान, सीमा सचदेव, शिल्पा शेट्टी, प्रिती झिंटा, डिनो मोरिया, संजय कपूर, लव सिन्हा, ऋतु कपूर, श्रद्धा कपूर, शफी चौधरी, मनीष मल्होत्रा, उद्योगपति लक्ष्मी निवास मित्तल, गौतम अडानी, वेदांताचे अनिल अग्रवाल, सुशील बजाज, माजी मंत्री प्रफुल्ल पटेल हे उदयपूरमध्ये पोहोचले होते. युगांडाचे राष्ट्रपती योवेरी मुसेवोनी आणि सऊदी अरबचे शेख रसल यांनीही या लग्नाला विशेष उपस्थिती लावली.

Story img Loader