आशिकी चित्रपटाचा तिसरा भाग येणार असल्याची घोषणा ५ सप्टेंबर रोजी करण्यात आली. या चित्रपटात कार्तिक आर्यन मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर या चित्रपटात मुख्य अभिनेत्री कोण असणार, याबद्दल चर्चा सुरू झाली. त्यातूनच टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट कार्तिक आर्यनसह मुख्य भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण दिग्दर्शक अनुराग बासू यांनी कास्टिंगच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत आणि चित्रपटाची स्टारकास्ट नंतर ठरवली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबद्दल अधिकृत निवेदन प्रसिद्ध केलंय.
“त्या भीतीने लोक…”; ‘गुडबाय’ सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात एकता कपूर अश्रू अनावर
जेनिफर विंगेट आशिकी ३ मध्ये कार्तिक आर्यनसह मुख्य भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती. या अफवांवर प्रतिक्रिया देताना, भूषण कुमारच्या टी सीरीजचे प्रवक्ते म्हणाले, “आशिकी ३ मधील कार्तिक आर्यनबरोबर मुख्य भूमिकेशी संबंधित कोणत्याही अफवांमध्ये तथ्य नाही. चित्रपटासाठी योग्य अभिनेत्रीचा शोध अजूनही सुरू आहे. आम्ही सध्या चित्रपटाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहोत आणि चित्रपटासाठी नवीन कल्पना घेऊन येत आहोत. प्रेक्षकांप्रमाणेच, आम्हीही चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीची निवड करण्यास आतुर आहोत. चित्रपटात कार्तिक आर्यनसमवेत कोणती अभिनेत्री दिसेल, याबद्दलची माहिती शक्य तितक्या लवकर चाहत्यांबरोबर शेअर करायला आम्हाला आवडेल.”
आशिकी ३ चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या कार्तिकने आपला आनंद व्यक्त केलाय. “मी आशिकीचा पहिला भाग पाहत मोठा झालोय आणि त्या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात काम करणे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. या संधीमुळे भूषण कुमार आणि मुकेश भट्ट यांच्याबरोबर काम करायला मिळणार असल्याने मी आनंदी आहे आणि मी अनुराग बासूचा खूप मोठा चाहता आहे,” असं कार्तिक म्हणाला.