बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं जाहीरपणे बॉलिवूडमध्ये असलेल्या घराणेशाहीच्या मुद्द्यावर बोलायला सुरुवात केल्यानंतर सोशल मीडियावर हा मुद्दा सर्वाधिक चर्चेत आला. फक्त सेलिब्रेटी आणि श्रीमंत घरच्या मुलांना बॉलिवूडमध्ये संधी मिळतात. पण बाहेरून आलेल्या किंवा अभिनयाची कौटुंबीक पार्श्वभूमी नसलेल्या कलाकारांना कौशल्य असूनही संधी मिळत नाही असं मत कंगनानं व्यक्त केलं होतं. आता एकेकाळी कंगनासोबत काम केलेल्या आणि स्टार किड असलेल्या अभिनेता शाहिद कपूरनं यावर प्रतिक्रिया दिली आहे. स्वतःचं उदाहरण देत शाहिदनं बॉलिवूडमध्ये घराणेशाही असल्याची बाब नाकारली आहे.

अभिनेता शाहिद कपूर मागच्या काही दिवसांपासून त्याचा आगामी चित्रपट ‘जर्सी’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अशाच एका प्रमोशन इव्हेंटमध्ये शाहिदनं बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या वादावर मोठं वक्तव्य केलं. ‘पंकज कपूर आणि नीलिमा अजीम यांसारख्या मोठ्या आणि प्रसिद्ध कलाकारांचा मुलगा असूनही मला कधीच अशा प्रकारच्या संधी मिळाल्या नाहीत’ असं तो यावेळी म्हणाला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला, ‘आम्हाला अशा संधी कधी मिळाल्याच नाहीत. लोकांना वाटतं की स्टार किड्सना सहज संधी मिळते पण त्यांना त्याची जाणीव नसते. माझं म्हणणं आहे की, मला स्वतःलाच बॉलिवूडमध्ये असं लॉन्च केलं गेलं नव्हतं.’

Rahul Gandhi criticized media for focusing on Ambanis wedding Adani and Modi not on farmers
राहुल गांधींची माध्यमांवर आगपाखड; म्हणाले, “शेतकरी व गरिबांचा मुद्दा…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
Vikrant Massey Family Live in Godown
“घरातून बाहेर काढलं, वर्षभर गोदामात राहिलो…”; बॉलीवूड अभिनेत्याने सांगितल्या कठीण काळातील आठवणी
Ajit Pawar on pratibha pawar
Ajit Pawar : “प्रतिभाकाकी मला आईसमान, पण मला पाडण्याकरता घरोघरी जाऊन प्रचार?” अजित पवारांचा सवाल
Arjun Kapoor And Malaika Arora
“त्रासदायक लोकांना…”, अर्जुन कपूरने ब्रेकअप बद्दल खुलासा केल्यानंतर मलायका अरोराने केलेली पोस्ट
Anupam Kher still lives in rented house
४० वर्षांपासून बॉलीवूडमध्ये काम करणारा अभिनेता राहतो भाड्याच्या घरात; म्हणाला, “कोणासाठी घ्यायचं?”

शाहिद कपूर पुढे म्हणाला, ‘मी एका अशा कुटुंबातून आलो आहे जिथे माझे आई-वडील प्रसिद्ध सेलिब्रेटी आहेत. पण मला कधीच अशा प्रकारच्या संधी मिळाल्या नाहीत. मी हळू हळू हे सर्व कमावलं आहे. मी आज जिथे आहे तिथे पोहोचायला बरीच मेहनत घेतली आहे.’ दरम्यान मागच्या वेळी शाहिद कपूर सुपरहिट चित्रपट ‘कबीर सिंह’मध्ये मुख्य भूमिकेत दिसला होता. त्याचा हा चित्रपट त्या वर्षातला सुपरहिट चित्रपट ठरला होता.

आता शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर यांच्या भूमिका असलेला ‘जर्सी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खरं तर हा चित्रपट उद्या म्हणजेच ३१ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र सध्या देशात करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे. हा चित्रपट ‘जर्सी’ या तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात शाहिद कपूरचे वडील पंकज कपूरही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.