बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहिदचे लाखो चाहते आहेत. गेल्या वर्षभरापासून त्याचे चाहते त्याच्या आगामी चित्रपट पाहण्यासाठी आतुर आहेत. त्यात शाहिदने त्याच्या चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे. लवकरच त्याचा आगामी चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं त्याने सांगितलं आहे.
शाहिदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जर्सी या त्याच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये शाहिद एका क्रिकेटरच्या रुपात दिसतं आहे. हे पोस्टर शेअर करत “वेळ आली आहे! ही भावना तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आम्ही गेल्या २ वर्षांपासून प्रतिक्षा करत आहोत. ही भूमिका खास आहे, ही कथा खास आहे, ही टीम खास आहे आणि आम्हाला हे सगळं तुमच्यासोबत मोठ्या पडद्यावर शेअर करायला नक्कीच आवडेल. मला आशा आहे की ती भूमिका साकारत असताना मला काय वाटले ते तुम्हाला वाटेल”, असे कॅप्शन शाहिदने दिले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजे २३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता प्रदर्शित होणार आहे. तर चित्रपट ३१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
आणखी वाचा : आमिर ‘या’ अभिनेत्री सोबत करणार तिसरं लग्न?
आणखी वाचा : रिटा रिपोर्टरच्या लग्नात गोकुळधाम सोसायटीच्या रहिवास्यांची हजेरी!
‘कबीर सिंग’नंतर शाहिदचा हा दुसरा तेलुगू चित्रपटाच्या रिमेकमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘जर्सी’ हा एका तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. जर्सीच्या तेलुगू चित्रपटाचे दिग्दर्शक गौतम तिन्नानुरी हेच हिंदी रिमेकचं दिग्दर्शन करणार आहेत. तेलुगू चित्रपटात नानी आणि श्रद्धा श्रीनाथ ही जोडी मुख्य भूमिकेत होती. तर हिंदीच शाहिदसोबत मृणाल ठाकूर मुख्य भूमिका साकारणार आहे. शाहिदने या चित्रपटासाठी ३५ कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं जात आहे.