बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा आगामी चित्रपट ‘जर्सी’ सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. कबीर सिंह या चित्रपटानंतर शाहिद आणखी एका तेलुगू चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार असल्यामुळे चाहते आनंदी आहेत. आता ‘जर्सी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘जर्सी’च्या २ मिनिटे ५३ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये शाहिद कपूरचा लूक हा कबीर सिंह चित्रपटातील लूकसारखाच वाटत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला शाहिद एक क्रिकेटपटू असल्याचे दाखवण्यात आले आहे. पण काही कारणास्तव तो क्रिकेट खेळणे सोडून देतो. त्यानंतर मुलाला नवी जर्सी घेऊन देण्यासाठी तो प्रयत्न करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्याचे पत्नी मृणाल ठाकूरसोबत भांडणही होते. दरम्यान, क्रिकेट टीममध्ये असिस्टंट कोचच्या नोकरीची ऑफर त्याला देण्यात येते. पण ती स्वीकारण्यास शाहिद नकार देतो.
आणखी वाचा : माधवी गोगटे यांच्या निधनानंतर अनुपमाची भावूक पोस्ट

‘जर्सी’ चित्रपटाचा ट्रेलर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. हा ट्रेलर आता पर्यंत ३ लाख ५४ हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. तर ४९ हजार लोकांनी लाइक केला आहे. सध्या सोशल मीडियावर हा ट्रेलर चर्चेत आहे.

‘कबीर सिंग’नंतर शाहिदचा हा दुसरा तेलुगू चित्रपटाच्या रिमेकमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. जर्सीच्या तेलुगू चित्रपटाचे दिग्दर्शक गौतम तिन्नानुरी हेच हिंदी रिमेकचं दिग्दर्शन करणार आहेत. तेलुगू चित्रपटात नानी आणि श्रद्धा श्रीनाथ ही जोडी मुख्य भूमिकेत होती. तर हिंदीच शाहिदसोबत मृणाल ठाकूर मुख्य भूमिका साकारणार आहे. शाहिदने या चित्रपटासाठी ३५ कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट ३१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jersey trailer shahid kapoor impresses as a father avb