‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो आहे. मागच्या काही काळात अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली. त्यामुळे सोडून गेलेल्या कलाकारांच्या जागी नवीन कलाकार येणार की जुनेच परत येणार यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. तारक मेहतांची भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढा यांनी मालिका सोडली, त्यानंतर त्यांना जैनीराज राजपुरोहित रिप्लेस करणार असल्याची चर्चा होती. परंतु निर्मात्यांनी या वृत्ताचं खंडण केलंय. अशातच मालिकेच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांचं लक्ष वेधलंय.

हेही वाचा – शैलेश लोढांच्या जागी ‘हा’ अभिनेता साकारणार तारक मेहतांची भूमिका?

two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Muramba
Video: “जोपर्यंत तू रमा…”, रमासारखी दिसणारी माही व अक्षय समोरासमोर येणार का? ‘मुरांबा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
punha kartvya aahe
Video: “तुम्ही कितीही दूर…”, वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो
Video a brother cried for a bride sister on a wedding day
या दिवशी प्रत्येक भाऊ रडतो! बहिणीजवळ ढसा ढसा रडला; VIDEO पाहून व्हाल भावुक
Sachet and Parampara blessed with baby boy
लग्नानंतर ४ वर्षांनी सेलिब्रिटी जोडप्याच्या घरी मुलाचा जन्म, व्हिडीओ शेअर करून दिली Good News

तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये जेठालाल अनेकदा अडचणी आणि संकटात सापडलेले दिसतात. त्यांच्या आयुष्यात एक संकट संपत नाही की दुसरं येतो. परंतु यावेळी त्यांना कोणत्याही संकटाची बातमी नाही तर आनंदाची बातमी मिळणार आहे. जेठालालच्या आयुष्यात आनंद येण्याची शक्यता कमी असते, पण यावेळी त्यांच्यासाठी एक खुशखबर आली आहे. त्यामुळे ही आनंदाची बातमी काय आहे हे जाणून घेण्यासाठी लोक आतुर आहेत.

हेही वाचा – दिग्दर्शक राजामौलींना ‘या’ दिग्गज अभिनेत्यासोबत करायचंय काम; मुलाखतीत बोलून दाखवली इच्छा

जेठालालच्या आयुष्यातील आनंदाच्या क्षणाबद्दल बोलायचं झाल्यास दयाबेन परत येतील का, हाच विचार प्रेक्षकांच्या मनात येतो. कारण लोक दयाबेनची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि आता हा प्रोमो पाहून त्या शोमध्ये परत येणार का, असं लोकांना वाटू लागलं आहे. त्यांच्याशिवाय मालिकेत मेहतासाहेब परतणार का, अशीही चर्चा आहे. त्यामुळे प्रेक्षक आगामी एपिसोडबद्दल खूप उत्सुक दिसत आहेत. पण हा प्रोमो पूर्ण पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की कोणतीही नवीन व्यक्ती या शोमध्ये येणार नाही. तर, जेठालाल अमेरिकेला जाणार ही आनंदाची बातमी आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – “सुकेशकडून गिफ्ट घेणारी नोरा फतेही साक्षीदार, मग मी आरोपी कशी?” जॅकलिन फर्नांडिसचा ईडीला सवाल

नव्या प्रोमोमध्ये जेठालालला अमेरिकेला जाण्याची संधी मिळाल्याचे दाखवण्यात येत आहे. जेठालालला बाघा आणि नट्टू काका ही बातमी देताना दिसत आहे. ही बातमी ऐकल्यानंतर जेठालालला धक्का बसल्याचं दिसतंय. दरम्यान, जेठालाल येत्या भागांमध्ये खरंच अमेरिकेला जाणार की त्याच्यावर येणारं संकट असेल, हे मालिकेच्या आगामी भागांमधूनच कळेल.

Story img Loader