‘झकास हिरॉईन- सीझन १’ ला मिळालेल्या यशानंतर 9X झकास ‘झकास हिरॉईन – सीझन २’ दाखल करण्यास सज्ज झाले आहे. एका आगामी मराठी चित्रपटाकरिता नायिकेचा शोध घेणारा टॅलण्ट हण्ट शो झकास हिरॉईन – सीझन सप्टेंबरच्या मध्यावधीपासून 9X झकास वर प्रसारित केला जाणार आहे. ‘झकास हिरॉईन-सीझन २’ च्या विजेतीला मराठी सुपरस्टार स्वप्निल जोशीसोबत प्रमुख नायिकेच्या भूमिकेत चमकायची संधी मिळणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा एक ख्यातनाम प्रोडक्शन हाऊस सांभाळणार आहे.
झकास हिरॉईनशी असलेल्या संलग्नतेविषयी बोलताना सुपरस्टार स्वप्निल जोशी म्हणाला, “मितवासाठी नायिकेचा शोध सुरु झाला, तो दिवस अगदी कालच असल्यासारखा वाटतो. आज प्रार्थना बेहेरेने प्रचंड यश मिळवले आहे आणि तिला मराठी चित्रपट उद्योगातील एक लोकप्रिय नायिका म्हणून ओळखले जाते. झकास हिरॉईन – सीझन 2चा भाग असल्याबद्दल मला आनंद वाटतो. या सीझनमधून अजून एका गुणी नायिकेचा शोध फळास येईल, याबद्दल मला विश्वास वाटतो.’’
झकास हिरॉईन – सीझन २चे परीक्षण मराठी चित्रपट उद्योगातील नामवंत अभिनेते-अभिनेत्रींपासून दिग्दर्शक, गायक-गायिका, संगीतकार आणि कोरीयोग्राफर्सची फळी करणार आहे. या परीक्षकांमध्ये स्वप्निल जोशी, सुबोध भावे, वैभव तत्त्ववादी, राकेश बापट, सोनाली कुलकर्णी, प्रिया बापट, मुक्ता बर्वे, पूजा सावंत, वैदेही परशुरामी, सतिश राजवाडे, सचिन कुंडलकर, आर. मधेश, स्वप्ना वाघमारे जोशी, वैशाली सामंत, अमितराज आणि फुलवा खामकर यांचा समावेश आहे.
झकास हिरॉईनमधील आपल्या अनुभवाबद्दल सांगताना अभिनेत्री प्रार्थना बेहेरे म्हणाली, “झकास हिरॉईनची विजेती ठरणे हा माझे आयुष्य बदलून टाकणारा क्षण होता. मितवा या माझ्या पहिल्या चित्रपटामध्येच मला स्वप्निल जोशी आणि सोनाली कुलकर्णीसोबत काम करायला मिळाले होते. मी त्यांच्याकडून खूप काही शिकले. अभिनेत्री बनू इच्छिणाऱया कोणत्याही मुलीकरिता झकास हिरॉईन हा उत्कृष्ट प्लॅटफॉर्म आहे. इथे स्पर्धकांना केवळ अभिनयाचे आणि नृत्याचे प्रशिक्षण दिले जाते असे नव्हे, तर त्याला चित्रपट उद्योगातील अतिशय नामवंत व्यक्तींच्या टीमकडून मार्गदर्शनही मिळते.’’
‘झकास हिरॉईन – सीझन २’साठी नावनोंदणी 3 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. अभिनेत्री होऊ इच्छिणाऱया मुलींनी http://www.jhakaasheroine.com वर लॉग ऑन करावे आणि आपले फोटो व अभिनयाची झलक दखवणारे व्हिडीयोज अपलोड करुन आपली नावनोंदणी करावी.
‘झकास हिरॉईन – सीझन २’ चे प्रोमोशन प्रिण्ट, डिजिटल आणि टेलिव्हिजन प्लॅटफॉर्मवर केले जाणार आहे. या टॅलण्ट हण्टकरिता http://www.jhakaasheroine.com ही वेबसाईट तयार करण्यात आली असून तिचे प्रोमोशन सोशल मीडियावर करण्यात येणार आहे. 9X झकासचे ट्विटर हँडल आणि फेसबुक पेजवर या शोच्या प्रत्येक भागाच्या अपडेट्स आणि स्पर्धकांची माहिती इ. असेल.
पुढच्या झकास हिरॉईनचा शोध आता सुरु झाला आहे!
झकास हिरॉईन – सीझन २
'झकास हिरॉईन- सीझन १' ला मिळालेल्या यशानंतर 9X झकास 'झकास हिरॉईन - सीझन २' दाखल करण्यास सज्ज झाले आहे. एका आगामी मराठी
आणखी वाचा
First published on: 04-08-2015 at 03:23 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jhakkas heroine season