झारखंडमधील अभिनेत्री रिया कुमारीची २८ डिसेंबर रोजी गोळी झाडून तिची हत्या करण्यात आली. रिया कुमारीच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. रिया कुमारी पती प्रकाश कुमार यांच्याबरोबर कारने प्रवास करत होती, त्यावेळी ही घटना घडली. आधी चोरीच्या उद्देशाने केलेल्या या हत्या प्रकरणात तिच्या पतीची भूमिका संशयास्पद आढळली आहे.
उर्फी जावेदचा तुनिषा शर्मा प्रकरणात शिझान खानला पाठिंबा; म्हणाली, “एखादी व्यक्ती तुमच्याबरोबर…”
‘आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, रिया कुमारीच्या कुटुंबीयांनी तिचा पती प्रकाश, त्याची पूर्वाश्रमीची पत्नी आणि दोन भावांविरुद्ध रियाचा मानसिक छळ केल्याचा आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. हावडा ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक स्वाती भंगालिया यांनी माहिती दिली की, मृत रिया कुमारीच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर प्रकाश कुमारला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर इतरही अनेक खटले आहेत. लवकरच या संपूर्ण प्रकरणाचा अधिक चांगला तपास केला जाईल.
अभिनेत्री रिया कुमारीची गोळ्या झाडून हत्या, पतीबरोबर प्रवास करताना घडली घटना
रिया पश्चिम बंगालच्या हायवेवरून कारने पतीबरोबर प्रवास करत होती. याच वेळी काही लोकांनी रियाची कार थांबवत त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. लुटमार करणाऱ्यांना बाजूला करण्यासाठी रिया मध्ये आली. यावेळी लुटमार करणाऱ्यांनी रियावर गोळी झाडत तिची हत्या केली होती. रियाचं कुटुंब हावडा मार्गे कोलकात्याला जातं होतं. ही घटना घडली, तेव्हा रिया आणि तिच्या पतीबरोबर त्यांची अडीच वर्षांची मुलगीही होती.
कोण होती रिया कुमारी?
रिया कुमारी झारखंडमधील अभिनेत्री होती. ती एक लोकप्रिय यूट्यूबर देखील होती. रिया कुमारीचा पती प्रकाश कुमार चित्रपट दिग्दर्शक आहे. प्रकाशने अनेक शॉर्ट फिल्म्स आणि जाहिराती बनवल्या आहेत. याशिवाय प्रकाशचा खाणींचाही व्यवसाय आहे.
“…अन् दिग्दर्शकाने मला आई-बहिणीवरुन शिवीगाळ केली”, नीना गुप्ता यांचा मोठा खुलासा
दरम्यान, रिया कुमारी आणि प्रकाश कुमार यांच्याबरोबर घडलेल्या घटनेची तपासणी करण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फूटेजची मदत घेत असल्याचं हावडा ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक स्वाती भंगालिया यांनी सांगितलं.