अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवरच आत्महत्या करत जीवन संपवलं. ही बातमी ऐकताच अवघ्या कलाविश्वाला दुःखद धक्का बसला. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक बातमी समोर आली आहे. झारखंडमधील अभिनेत्री रिया कुमारीवर गोळी झाडून तिची हत्या करण्यात आली आहे. रिया कुमारीच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?
‘आजतक’च्या वृत्तानुसार, रिया कुमारी पती प्रकाश कुमार यांच्याबरोबर कारने प्रवास करत होती. दरम्यान काही लोकांनी रियाची कार थांबवत त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. लुटमार करणाऱ्यांना बाजूला करण्यासाठी रिया मध्ये आली. यावेळी लुटमार करणाऱ्यांनी रियावर गोळी झाडत तिची हत्या केली.

Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Anjali Damania on Walmik Karad
Anjali Damania : संतोष देशमुख हत्याप्रकरणात अंजली दमानिया यांचा आणखी एक गौप्यस्फोट, PCR ची प्रत शेअर करत म्हणाल्या…
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
bhosri Balajinagar slum youth and accomplices ransacked womans house
पिंपरी : चपलेने मारल्याचा बदला घेण्यासाठी महिलेच्या घरात घुसून तोडफोड
ananya pandey marriage plans
अनन्या पांडे ‘या’ व्यक्तीला करतेय डेट? अभिनेत्री लग्नाचे प्लॅन्स शेअर करत म्हणाली, “पुढील पाच वर्षांत…”
Marathi Actress Tejashri Pradhan exit from Premachi goshta marathi serial
तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून एक्झिट! आता मुक्ताच्या भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री

आणखी वाचा – Tunisha Sharma Suicide : धर्म आणि वय नाही तर ‘या’ कारणामुळे केलं तुनिषाशी ब्रेकअप, शिझानचा पोलिसांसमोर खुलासा

‘आजतक’ला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिया तिच्या कुटुंबियांसह हावडा एक्सप्रेसद्वारे कोलकत्ताला जात होती. यावेळी रिया, तिचे पती व त्यांची अडीच वर्षांची मुलगीही कारमध्ये होती. आज (२८ डिसेंबर) सकाळी ६च्या सुमारास बग्नानच्या महेश खेडा ब्रीजजवळ ही घटना घडली.

आणखी वाचा – Video : आत्महत्येच्या तीन दिवसांपूर्वी नाचली, ख्रिसमस सेलिब्रेट केलं, २३ वर्षीय सोशल मीडिया स्टारचा ‘तो’ शेवटचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान रियाच्या पतीने त्याचक्षणी राजापूर पोलीस ठाणं गाठलं. तसेच संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी रियाचा मृतदेह ताब्यात घेतला. सध्या ते योग्य तो तपास करत आहेत. रियाचे पती प्रकार कुमार चित्रपट दिग्दर्शक आहेत. हावडा ग्रामीण पोलिस ठाण्यातील स्वाती यांनी सांगितलं की, “आम्ही सध्या या घटनेची चौकशी करत आहोत. परिसरामध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी सुरू आहे.” रिया झारखंडमधील ‘वह चलचित्र’ मालिकेमध्ये काम करत होती. शिवाय ती एक प्रसिद्ध युट्युबरही होती.

Story img Loader