अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘झुंड’ सध्या बराच चर्चेत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केलं आहे. जेव्हा बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं पहिल्यांदा चित्रपट पाहिला त्यावेळी त्यानं फार भावुक प्रतिक्रिया दिली होती. एवढंच नाही तर त्यावेळी त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. यावर आता अभिनेता अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘झुंड’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका आहे. जेव्हा हा चित्रपट आमिर खाननं पाहिला त्यावेळी तो अक्षरशः रडला होता. त्यानं या चित्रपटाचं खूप कौतुकही केलं होतं. हा अमिताभ यांचा आतापर्यंतचा सर्वात उत्तम चित्रपट आहे असंही आमिरनं प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं. आमिरच्या या प्रतिक्रियेवर आता अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि आमिरचे आभार मानले आहेत.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Amitabh Bachchan talks about intercultural marriages in his family
“भावाचं लग्न सिंधी मुलीशी, मुलगी पंजाबी कुटुंबात अन् मुलगा…”; अमिताभ बच्चन यांचे कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाबाबत वक्तव्य
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”
Amitabh Bachchan angry post
“मूर्ख आणि बिनडोक…”, अमिताभ बच्चन कोणावर भडकले? म्हणाले, “विवेकहीन आणि अर्धवट बुद्धी…”

आणखी वाचा- प्रसिद्ध अभिनेत्यानं १५ वर्षीय रेखा यांना तब्बल ५ मिनिटं जबरदस्तीने केलं किस, अन्…

चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनापूर्वीच आमिरला हा चित्रपट दाखवला होता आणि त्यानंतर आमिरच्या प्रोडक्शन हाऊसनं यावर एक व्हिडीओ युट्यूबवर शेअर केला होता. यामध्ये आमिर म्हणतोय, ‘काय चित्रपट आहे. सर्वोत्तम. हा पहिला चित्रपट आहे ज्याला खासगी स्क्रिनिंगच्या वेळी स्टँडिंग ओव्हेशन मिळालं आहे. अमिताभ बच्चन याचा अभिनय तर उत्तमच आहे. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक उत्तम चित्रपट केले मात्र हा सर्वाोत्तम चित्रपट आहे.’

आणखी वाचा- बिपाशा बासूच्या प्रेग्नन्सीच्या चर्चा, पती करण सिंग ग्रोवर सोशल मीडियावर होतोय ट्रोल

आमिरच्या या व्हिडीओवर ‘बॉलिवूड हंगामा’शी बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले, ‘आमिर नेहमीच अति-उत्साहित होतो. पण मी त्याचे आभार मानतो. कारण मला वाटतं की, तो एक उत्तम समीक्षक आहे. त्यांच्या या चांगल्या शब्दांसाठी मी त्याचे आभार मानतो.’ दरम्यान ‘झुंड’ चित्रपट पाहिल्यानंतर मराठीतील अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. याशिवाय काही राजकीय व्यक्तींच्याही प्रतिक्रिया चर्चेत आहेत. या चित्रपटाचं सर्वत्र खूप कौतुक होताना दिसत आहे.

Story img Loader