नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट नुकतंच प्रदर्शित झाला. या चित्रपटात बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. सध्या ‘झुंड’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. अनेक समीक्षकांनी या चित्रपटाची स्तुती केली आहे. नुकतंच या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसचे कलेक्शन समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी नुकतंच ट्विटरवर याबाबतची माहिती शेअर केली आहे. तरण आदर्श यांनी या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी १.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. मात्र इतर चित्रपटांच्या तुलनेत या चित्रपटाची कमाई फार कमी आहे. काल प्रदर्शित झालेला या चित्रपटाच्या कमाईत येत्या विकेंडला वाढ होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

“महानायकाला आणि महामानवाला तू एकाच फ्रेममध्ये आणलंस हे फक्त…”, ‘झुंड’ पाहिल्यानंतर जितेंद्र जोशीची भावूक प्रतिक्रिया

दरम्यान, ‘झुंड’ हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jhund day 1 box office amitabh bachchan and nagraj manjule film know about collection nrp