बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला झुंड चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे. या चित्रपटाच्या कमाईची सुरुवात संथगतीने झाली होती. मात्र आता या चित्रपटाच्या कमाईत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे अनेक चित्रपट समीक्षक आणि कलाकार कौतुक करताना दिसत आहे. नुकतंच या चित्रपटाच्या १० व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहेत.
झुंड हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या ४ मार्चला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. ‘झुंड’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाची कथा अनेक प्रेक्षकांना आवडली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला, त्यावेळी या चित्रपटाची कमाई संथगतीने सुरु होती. मात्र आता या चित्रपटाच्या कमाईमध्ये चांगलीच वाढ होताना दिसत आहे.
गेल्या शुक्रवारी म्हणजे ४ मार्चला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सातव्या दिवसापर्यंत ११.३० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात दररोज १ कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. मात्र दुसऱ्या आठवड्याच्या शुक्रवारी या चित्रपटाच्या कमाईत काहीशी घट झाल्याचे दिसत आहे.
झुंड या चित्रपटाने ११ मार्चला ८५ लाख रुपयांची कमाई केली आहे. त्यानंतर शनिवारी १२ मार्चला पुन्हा या चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे. शनिवारी चित्रपटाने १.३० कोटींचा गल्ला जमवला. त्यामुळे झुंड चित्रपटाची गेल्या दहा दिवसांची एकूण कमाई आता जवळपास १३. ५३ कोटी रुपयांच्या आसपास पोहोचली आहे.
“आजपासून ९ वर्षांपूर्वी मी…”, व्हिडीओ शेअर करत हृता दुर्गुळे झाली भावूक
‘झुंड’ हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. तर यानिमित्ताने आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु ही जोडी पुन्हा एकत्र पडद्यावर झळकत आहे.