नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक दिवस उलटले आहेत. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत असल्याचे दिसत आहे. मात्र या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या सविता राज हिरेमठ यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट करमुक्त करण्यावरुन सवाल उपस्थित केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सविता राज हिरेमठ यांनी नुकतंच फेसबकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाईल्स’वर भाष्य केले आहे. यात त्या म्हणाल्या, “मी नुकतंच द कश्मीर फाईल्स हा चित्रपट पाहिला. यात काश्मिरी पंडितांच्या संघर्षाची कहाणी दाखवली आहे. ही कहाणी खरंच फार हृदयद्रावक आहे. तसेच हा चित्रपट म्हणजे काश्मिरी पंडितांचा आवाज आहे.पण झुंडची निर्माती म्हणून मी सध्या गोंधळली आहे. झुंड हा देखील एक महत्त्वाचा चित्रपट आहे. त्याची कथा आणि त्यातून देण्यात आलेला संदेश फार महत्त्वपूर्ण आहे. याला प्रेक्षकांकडून उदंड प्रशंसा आणि प्रतिसाद मिळत आहे.”

“त्यामुळेच मला हे जाणून घ्यायचे आहे की सरकार एखादा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय नेमकं कोणत्या निकषावर घेते. एखाद्या चित्रपटाचे सोशल मीडियाद्वारे समर्थन करणे, एखाद्या कार्यालयांना चित्रपट पाहण्यासाठी सांगणे किंवा मग त्यातील कर्मचार्‍यांना चित्रपट पाहण्यासाठी अर्धा दिवस सुट्टी देण्यास सांगून त्याचे समर्थन करण्यास सांगणे. शेवटी झुंड देखील एक असा विषय आहे जो आपल्या देशाच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचा आहे.. झुंड हा चित्रपट केवळ जात आणि आर्थिक विषमतेबद्दल बोलत नाही तर समाजातील खालच्या स्तरातील लोकांना त्यांची यशोगाथा शोधण्याचा मार्ग देखील दाखवतो”, असे त्या म्हणाल्या.

अनुष्का शर्मा स्वत:च्या निर्मिती कंपनीतून झाली पायउतार, सख्ख्या भावासोबतची भागीदारी तोडत म्हणाली “याचा हक्काचा मालक…”

दरम्यान निर्मात्या सविता राज हिरेमठ यांनी शेअर केलेली ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. झुंड हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. गेल्या ४ मार्चला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. ‘झुंड’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाची कथा अनेक प्रेक्षकांना आवडली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला, त्यावेळी या चित्रपटाची कमाई संथगतीने सुरु होती. मात्र आता या चित्रपटाच्या कमाईमध्ये चांगलीच वाढ होताना दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jhund movie producer savita raj hiremath raised question on the kashmir files being tax free said what is the scale nrp
Show comments