प्रत्येक तासानंतर सूरजने आपल्याशी बोलावे, अशी झियाची इच्छा होती. परंतु प्रत्येकवेळी ती पाळणे शक्य नव्हते. मात्र आपल्याला शक्य होईल तेव्हा आपण तिच्या संपर्कात राहायचो, असे सूरजने पोलिसांना सांगितले आहे. आपला आत्महत्येशी तसा संबंध नाही, असेही त्याने पोलिसांना स्पष्ट केले आहे.
सूरज हा झियाचा खास मित्र होता. परंतु एकाकी पडलेल्या झियाला त्याने आपल्याशी सतत बोलावे, असे वाटत होते. त्यातच त्याचे अन्य कुठेतरी सुत जुळल्याची तिला दाट शक्यता वाटत होती. सूरजला केलेल्या एसएमएसमधून ती व्यक्त झाली आहे. केवळ या मुद्दय़ावरून सूरजला झियाच्या आत्महत्येप्रकरणी दोषी धरता येईल का, याची तपासणी करीत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. झियाच्या शवचिकित्सेचा अहवालही पोलिसांना मिळाला असून त्यात तिने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र तिला आत्महत्येस कुणी प्रवृत्त केले का, याची चौकशी करीत असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा