सुभाष घईंचा १९८३ मधला हिट चित्रपट ‘हिरो’चा पुर्ननिर्माण (रिमेक) होणार आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफ. मिनाक्षी, शम्मी कपूर, संजीव कुमार या कलाकारांनी अभिनय केला होता. मुक्ता आर्टस आणि सलमान खान प्रोडक्शन मिळून ‘हिरो’चित्रपटाचा रिमेक करणार आहेत. या चित्रपटाकरिता सूरज पांचोली आणि सुनिल शेट्टीची मुलगी अथिया हिची निवड करण्यात आल्याची चर्चा होती. मात्र सदर चित्रपटाकरिता या दोघांनाही निश्चित न केल्याचे सुभाष घई यांनी सांगितले आहे. तरी चित्रपटासाठी आम्ही नवीन चेह-यांचा विचार करत असून यासाठी मी लवकरच सलमानची भेट घेईन, असे सुभाष घई म्हणाले.
घई म्हणाले की, सूरज एक चांगला मुलगा आहे. त्याच्या वैयक्तिक वागणूकीबाबत सांगता येणार नाही. परंतु, चित्रपटसृष्टीत काम करण्याच्या दृष्टीकोनातून पाहता तो नक्की पुढे जाईल, असे ते म्हणाले.
दरम्यान, सूरज पांचोलीला २७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.

Story img Loader