पोलिसांनी जिया खान आत्महत्येप्रकरणी न्यायालयाकडे सूरज पांचोलीची नारको परीक्षण करण्याची मागणी केली होती. मात्र, त्याच्या एक दिवसानंतरच आज (शनिवारी) सूरजच्या वकिलांनी परीक्षणास सहमती देणार नसल्याचे सांगितले.
सूरजचे वकील जमीर खान म्हणाले की, त्याचे वय कमी असल्यामुळे आम्ही याची परवानगी देणार नाही. कायद्यानुसार कोणतेही रासायनिक परीक्षण आरोपीच्या परनानगीविना करता येत नाही. सूरजच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी सूरजच्या नारको परीक्षणाची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली आहे. न्यायालय यावर सोमवारी निर्णय देण्याची शक्यता आहे. ३ जून रोजी जिया खानने आत्महत्या केली होती. त्याप्रकरणी आदित्य पांचोली आणि जरीना वहाब यांचा मुलगा सूरज याला अटक करण्यात आली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 29-06-2013 at 11:42 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jiah khan suicide case