अभिनेत्री जिया खान आणि तिचा प्रियकर सूरज पांचोली यांच्यातील संबंध ताणले गेल्याने जियाने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. पंरतु त्या दिवशी दोघांमध्ये एका मेसेजमुळे झालेल्या गैरसमजातून जियाने टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.आत्महत्या करण्यापूर्वी जिया आणि सूरज यांच्यात मेसेजद्वारे तसेच फोनवर संभाषण झाले होते. निलू ही जियाची मैत्रीण होती. सूरज आणि नीलूमध्ये वाढती जवळीक त्यांच्या संबंधांत तणाव निर्माण करत होती. निलूवरून त्या दोघामंध्ये सोमवारी भांडण झाले होते. ‘तू निलूबरोबर डेटिंगला का जातोस’, असा सवाल जियाने केला होता. ‘मी १० वाजता नीलूला भेटणार आहे’, असे सूरजने जियाला सांगितले होते. जेव्हा रात्री साडेनऊच्या सुमारास जिया सूरजला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली तेव्हा तो भेटला नाही. तो नीलूला भेटण्यासाठी गेला असावा, असा तिचा समज झाला. वास्तविक सूरज नीलूला दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता भेटणार होता. पण रात्रीच सूरज निलूला भेटायला गेला, असा तिचा समज झाला आणि आधीच निराश असलेल्या जियाने आत्महत्येचा निर्णय घेतला. १० रात्रीचे की सकाळचे हा गोंधळ झाला नसता तर कदाचित जियाचा जीव वाचला असता असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा