करोनाच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मनं चित्रपटगृहांना मोठी मात दिली आहे. आता ना कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रतीक्षा असते ना बॉलिवूडमध्ये काम मिळण्याची चिंता. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी वाट पाहावी लागत नाही. पण या दोन्ही माध्यमांमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे न्यूड सीन किंवा न्यूडीटी. मोठ्या पडद्यावर बोल्ड किंवा न्यूड सीन दाखवणं काळानुसार वाढत गेलं. पण ओटीटीवर तर याचं स्वातंत्र्य त्यापेक्षा जास्त आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या कॉन्टेन्टमध्ये न्यूडीटीचं प्रमाण जास्त असल्याचं पाहायला मिळतं. मागच्या काही काळात अनेक कलाकारांनी यावर भाष्य केलं आहे. त्यानंतर आता अभिनेता जिम्मी शेरगिलनंही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपटांमध्ये असणाऱ्या न्यूडीटीबाबत बोलताना अभिनेता जिम्मी शेरगिल म्हणाला, ‘कोणताही चित्रपट किंवा वेब सीरिजची निवड करताना माझे स्वतःचे काही नियम आहेत ते मी आवर्जून पाळतो. मी अशाच भूमिकांसाठी होकार देतो ज्या तुम्ही सर्वांसोबत, तुमच्या कुटुंबासोबत बसून पाहू शकता. ओटीटी प्रोजेक्ट्स निवडताना मी अशाप्रकारचा कॉन्टेन्ट असलेल्या चित्रपटातच काम करणं पसंत करतो.’
हिंदुस्तान टाइम्सनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार जिम्मी म्हणाला, ‘मी अशाप्रकारच्या चित्रपट किंवा वेब सीरिजमध्ये काम करतो. ज्याच्याशी मला काही कनेक्शन जाणवतं. उद्या जर मला कोणी कॉमेडी सीरिज करायला सांगितली आणि ती कौटुंबीक असेल, तर मी नक्कीच करेन. जास्तीत जास्त लोक ती पाहतील आणि त्याला स्वतःशी जोडू पाहतील. हे माझ्या डोक्यात असतं.’
जिम्मी शेरगिल पुढे म्हणाला, ‘सध्या असभ्य भाषा आणि न्यूड सीन ही चित्रपटामध्ये सामान्य बाब असलेली दिसते. पण या सर्व गोष्टी मला योग्य वाटत नाही. मला कम्फर्टेबल वाटत नाही. जोपर्यंत कथेची मागणी नसेल तोपर्यंत असा कोणताही सीन देणं मला योग्य वाटत नाही. मी कोणती भूमिका साकारत आहे यावर मी न्यूड सीन द्यावा की नाही हे अवलंबून आहे. पण केवळ एका विशिष्ट प्रकारच्या प्रेक्षकवर्गासाठी मी अशाप्रकारचा सीन कधीच देणार नाही. त्यामुळे हे माझ्यासाठी समजण्यापलिकडे आहे.’
जिम्मी शेरगिलच्या कामाबद्दल बोलयचं तर, रंगबाज, हॉनर सीझन १ आणि २ मध्ये दिसला आहे. त्याचा ब्लॉकबस्टर म्यूझिकल रोमँटिक चित्रपट मोहोब्बतें २००० साली रिलीज झाला होता. ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.