कलाविश्वात समर्पक वृत्तीने काम करणाऱ्या प्रत्येक कलाकारासाठी पुरस्कारांच्या रूपाने मिळालेली पसंतीची पोचपावती खूप महत्त्वाची असते. त्यामुळेच दरवर्षी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन विश्वातील कलाकारांचे कौतुक करण्यासाठी विविध पुरस्कार सोहळ्यांचे आयोजन करण्यात येते. त्यातीलच एक नाव म्हणजे ‘फिल्मफेअर पुरस्कार’ सोहळा. मराठी चित्रपटसृष्टीत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘फिल्मफेअर पुरस्कार (मराठी) २०१७’ चा सोहळा नुकताच पार पडला. यावेळी मराठीतील अभिनेत्रींचा ग्लॅमरस अंदाज तर पाहावयास मिळालाच पण त्याचसोबत बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित आणि ‘मस्तानी’ दीपिका पदुकोण या दोघीही सोहळ्याला उपस्थित होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : ‘देशासाठी मी काय करावे हे मला दुसऱ्याने सांगण्याची गरज नाही’

गेल्या वर्षी २०१६ मध्ये आपल्याला विविध विषयांवरील एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट पाहावयास मिळाले. ‘नटसम्राट’, ‘सैराट’, ‘व्हेंटिलेटर’, ‘एक अलबेला’ या चित्रपटांनी प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले होते. त्यातही ‘सैराट’ने तर साता समुद्रापार प्रसिद्धी मिळवत सर्वांना याड लावलं. केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही तर विविध पुरस्कार सोहळ्यांमध्ये या चित्रपटाची मक्तेदारी पाहायला मिळाली. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातही ‘सैराट’ने तब्बल ११ पुरस्कारांवर आपले नाव कोरले. प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या ‘व्हेंटिलेटर’ने पाच तर महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ने तीन पुरस्कारांवर नाव कोरले.

वाचा : ‘हम आपके है कौन’च्या सेटवर अनुपम खेर यांना आला होता अर्धांगवायूचा झटका

‘नटसम्राट’ चित्रपटासाठी अभिनेते नाना पाटेकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. ‘फॅमिली कट्टा’ चित्रपटासाठी वंदना गुप्ते यांना क्रिटिक अवॉर्ड तर सई ताम्हणकरला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : नागराज मंजुळे (सैराट)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : रिंकू राजगुरु (सैराट)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : विक्रम गोखले (नटसम्राट)
सर्वोत्कृष्ट संगीत : अजय-अतुल (सैराट)
सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक : राजेश मापुस्कर (व्हेंटिलेटर)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता : आकाश ठोसर (सैराट)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री : रिंकू राजगुरु (सैराट)
सर्वोत्कृष्ट संवाद : सैराट
सर्वोत्कृष्ट चित्रपट : सैराट
सर्वोत्कृष्ट गायक : अजय गोगावले (याड लागलं, सैराट)
सर्वोत्कृष्ट गायिक : चिन्मयी श्रीपाद (सैराट झालं जी, सैराट)
सर्वोत्कृष्ट गीत : याड लागलं (सैराट)
सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाइन – वासू पाटील (हाफ तिकीट)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी – संजय मेमाणे (हाफ तिकीट)
सर्वोत्कृष्ट कथा – राजेश मापुस्कर (व्हेंटिलेटर)
सर्वोत्कृष्ट पटकथा – राजेश मापुस्कर (व्हेंटिलेटर)
सर्वोत्कृष्ट संकलन – रामेश्वर भगत (व्हेंटिलेटर)
सर्वोत्कृष्ट नृत्य – राहुल ठोंबरे, संजीव होवलाडर (काका-वायझेड)
सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाइन – संजय मौर्य, ऑलवीन रेगो (व्हेंटिलेटर)
सर्वोत्कृष्ट सिनेमा (क्रिटिक) – नटसम्राट

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jio filmfare awards marathi 2017 complete winners list
Show comments