दोन वर्षाच्या चिंटूपासून ते ८० वर्षांच्या गोडबोले आजींपर्यंत सगळ्यांनाचं सेल्फीवेडानं झपाटलयं, हे काही वेगळं सांगायला नको. श्रीमंत-गरीब, नेता ते अभिनेता अशा सगळ्याचं वर्गवारींमध्ये एक गोष्ट सारखी झाली आहे आणि ती म्हणजे आपली सगळ्यांचीचं लाडकी ‘सेल्फी’. आता या यादीत पारगाव टेकवडे निवासी भारतराव झेंडेही सामिल झालेत. याची भूमिका बजावली आहे ‘जितेंद्र जोशी’ या आघाडीच्या कलाकाराने. वायकॉंम18 मोशन पिक्चर्स निर्मित ‘पोश्टर गर्ल’मध्ये मराठी मनावर स्वार जितेंद्र जोशी या सेल्फी वेडापुढे पार हात टेकताना दिसतोयं.
पोश्टर गर्लच्या स्वयंवरासाठीचे हे पहिले उमेदवार आहेत. शेतकरी ते विकासक व्हाया उपसरपंच असं पावरबाज व्यक्तीमत्त्व जे दोन गोष्टींच्या मागे पार खुळं झालयं. पहिली म्हणजे‘सेल्फी’ आणि दुसरी म्हणजे ‘पोश्टर गर्ल’. तर अशा या सेल्फी दिवाण्या जितूला तुम्हाला १२ फेब्रुवारीला पोश्टर गर्ल या चित्रपटात पाहता येईल.
जितूलाही लागले सेल्फीचे वेड!
जितेंद्र जोशी या सेल्फी वेडापुढे पार हात टेकताना दिसतोयं.
Written by चैताली गुरवguravchaitali
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-01-2016 at 10:46 IST
TOPICSपोस्टर गर्ल
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra joshi character in poshter girl