सिनेसृष्टीत दोन पध्दतीचे कलाकार आहेत. पहिले जे दिग्दर्शकाने दाखवलेली वाट चालतात आणि दुसरे म्हणजे दिग्दर्शकाने सुचवलेल्या वाटेवर चालताना आपल्या उत्स्फूर्तपणाचा अनुभव देतात. जितेंद्र जोशी त्यापैकीच एक आहे. प्रदर्शनाच्या वाटेवर असलेला पोश्टर गर्ल या चित्रपटाचा लेखक हेमंत ढोमे आणि दिग्दर्शक समीर पाटील यांना नुकताच हा अनुभव आला. लेखकाने लिहिलेली संहिता दिग्दर्शक समीर पाटीलने जितेंद्रला समजावून सांगितल्यानंतर, त्या भूमिकेला समजून घेत आपल्या चालण्या-बोलण्याच्या पध्दतीत त्याने बदल केल्याचे समीरने सांगितले.
तर याविषयी बोलताना हेमंत ढोमे म्हणाला की, भारतराव झेंडेची भूमिका जितेंद्रला दिल्यानंतर त्याने त्या भूमिकेला समजून घेत आपल्या पध्दतीने ती परिपूर्ण केली. या चित्रपटात जितेंद्र सतत आपल्याला कुणाला न कुणाला मारताना दिसणार आहे. हे त्याचेच कौशल्य असल्याचे हेमंत म्हणाला.
या चित्रपटात जितेंद्र गावच्या उपसरपंचाच्या भूमिकेत दिसणार आहे. आपल्या सामाजिक प्रतिष्ठेचे भान राखत आपण कसे वरचढ आहोत हे दाखवण्यासाठी जितू सगळयांनाच मारत सुटलायं. या चित्रपटात जितेंद्रबरोबर अनिकेत विश्वासराव, सिध्दार्थ मेनन, संदीप पाठक, अक्षय टंकसाळे, हेमंत ढोमे आणि इतर काही दिग्गज आपल्याला दिसणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा