लोकप्रिय अभिनेता जिंतेंद्र जोशी लवकरच ‘कार्टेल’ या हिंदी वेब सीरिजमध्ये एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मधुकर म्हात्रे उर्फ मधुभाई ही भूमिका जितेंद्र या वेब सीरिजमध्ये साकारतोय. लोकसत्ता डिजीटल अड्डावर जितेंद्र जोशीने हजेरी लावली. यावेळी त्याने या वेब सीरिजमधील त्याच्या भूमिकेबद्दल मनसोक्त गप्पा मारल्या आहेत. अल्ट बालाजीच्या या वेब सीरिजमध्ये मुंबई आणि मुंबईवर वर्चस्व गाजवू पहाणाऱ्या विविध गट, त्यांच्यातील संघर्षाची कथा पाहायला मिळणार आहे.

या वेब सीरिजमध्ये अभिनेता जितेंद्र जोशी एका मुख्य भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमधील गुंडगिरी करणारा मधुभाई हा तापट स्वभावाचा असला तरी तो निस्वार्थी आहे. जितेंद्रसोबतच अनेक बडे कलाकार या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारताना दिसतील.

२० ऑगस्टला ‘कार्टेल’ ही वेब सीरिज अल्ट बालाजी आणि एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित होणार आहे.