छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे ‘जीव माझा गुंतला.’ या मालिकेत सध्या एक वेगळे वळण आले आहे. नियतीच्या खेळीत अडकलेले दोन जीव अंतरा मल्हार एकत्र कसे येणार ? अखेर अंतराचा मल्हार होणार का याची सध्या जोरदार चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली आहे. बहिणीच्या चालाखीने अंतरा-मल्हारच्या नात्याची गाठ बांधली जाणार? गैरसमजातून हे नातं दूर जातंय का असं वाटत असतानाच नियतीने पुन्हा पुन्हा अंतर-मल्हारला एकमेकांसमोर आणलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अचानक भेटण असो किंवा मग भांडण असो अंतरा-मल्हार एकमेकांना भेटत राहिले. कारण काहीही असलं तरी प्रत्येक टप्प्यावर प्रेक्षकांना मात्र हेच वाटत राहिलं कि श्वेताच बिंग फुटणार आणि अंतरा-मल्हार एकत्र येणार. पण नियतीचा हा खेळ थोडा अनपेक्षितच ठरला. श्वेताने रचलेले सगळेच डाव अनपेक्षितरित्या अंतरानेच पूर्ण केले आणि अंतरा-मल्हारचे सूर जुळणार कि नाही या रोमांचक वळणावर प्रेक्षकांना घेऊन आले.

जीव माझा गुंतला या मालिकेत श्वेताचे सगळे प्रयत्न यशस्वी होऊन मल्हार बोहोल्यावर चढणार का? पत्रिकेचे सत्य समोर येऊनही अंतरा ते गुपित लपवून ठेवणार का? लग्नाच्या शुभमुहूर्तावर खरं सगळ्यांसमोर येऊन चित्र पालटणार असं कुठेतरी वाटतं आहे. या शुभ मुहूर्तावर श्वेता, अंतरा आणि मल्हार यांचं आयुष्य नक्की कुठलं वळण घेणार? श्वेता आणि मल्हारच्या लग्नाच्या सगळ्या विधी पार पडत असताना अचानक असं नेमकं काय घडणार की मंडपात श्वेता ऐवजी अंतराला उभ राहावं लागणार? मल्हार आणि अंतरा या लग्नाला विरोध करतील? कि श्वेता नवा डाव खेळणार ज्यामुळे हा प्रश्न कायम राहणार होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना आगामी भागात मिळणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jiv majha guntala serial update avb