देशात पुन्हा एकदा करोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. मागच्या काही दिवसांत बऱ्याच बॉलिवूड कलाकारांना करोनाची लागण झालेली दिसत आहे. अशात आता अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रुंचाल यांनाही करोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. जॉननं स्वतःच याबाबतची माहिती सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागच्या काही दिवसांमध्ये बऱ्या बॉलिवूड कलाकारांना करोनाची लागण झाली आहे. दरम्यान करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशातील चित्रपटगृहं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बऱ्याच चित्रपटांची प्रदर्शन पुढे ढकलण्यात आली आहे. पण मागच्या काही दिवसांपासून चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये बिझी असलेल्या कलाकारांना मात्र करोनाची लागण झाल्याचं चित्र आहे. ज्यात आता जॉन अब्राहमच्या नावाचीही भर पडली आहे.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना जॉननं लिहिलं, ‘३ दिवसांपूर्वी मी एका व्यक्तीच्या संपर्कात आलो होतो. मला नंतर समजलं की ती व्यक्ती करोना पॉझिटिव्ह होती. आता मला आणि माझी पत्नी प्रियाला करोनाची लागण झाली आहे. आम्ही दोघंही घरीच क्वारंटाइन आहोत. आमचं दोघांचंही लसीकरण पूर्ण झालं आहे आणि आम्हाला करोनाची फारच सौम्य लक्षण दिसत आहेत. कृपया सर्वांना काळजी घ्या. सुरक्षित राहा. मास्कचा वापर करा.’

अलिकडच्या काळात दिग्दर्शक राहुल रवैल, नोरा फतेही, मृणाल ठाकूर, अर्जुन कपूर, रणवीर शौरीचा मुलगा, अर्जुन कपूर आणि त्याची बहीण अंशुला कपूर यांनाही करोनाचं संक्रमण झालं आहे. त्याआधी मलायका अरोराची बहीण अमृता अरोरा, करिना कपूर, सीमा खान, महिप कपूर यांना करोनाची लागण झाली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: John abraham and his wife priya runchal tested corona positive mrj