‘वेलकम’ चित्रपटाचा सिक्वल ‘वेलकम बॅक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. ‘वेलकम’ पेक्षाही जास्त हास्यकल्लोळ या चित्रपटात असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
२००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘वेलकम’मध्ये अक्षय कुमारने प्रमुख भूमिका केली होती. त्याची जागा आता जॉन अब्राहमने घेतली आहे. ‘वेलकम बॅक’मध्ये श्रुती हसन, डिंपल कपाडिया, नसिरुद्धीन शाह, शायनी अहुजा हेदेखील दिसणार आहेत. फर्स्ट लूकमध्ये वरात्यांच्या पोशाखातील हे कलाकार ट्रम्पेट वाजवताना दिसत आहेत.
अनीस बाझ्मी दिग्दर्शित ‘वेलकम बॅक’ मार्च २०१५ला प्रदर्शित होईल.
welcome-back-embed

Story img Loader