बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. जॉन त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. पण कदाचित अनेकांना माहीत नसेल की, तरुण वयात जॉनला खाण्यापिण्याची खूप आवड होती. यामुळे, एकदा त्याने एका रेस्टॉरंटमध्ये ६४ चपात्या खाल्ल्या होत्या. याचा खुलासा जॉनने एका शोमध्ये केला होता.
जॉन ‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘अटॅक’ या त्याचा आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेला होता. त्याच्यासोबत अभिनेत्री रकुल प्रीत सिंहनेही हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी कपिलसोबत अनेक गोष्टीवर गप्पा मारल्या. यावेळी शोचा होस्ट कपिल शर्मा जॉनला प्रश्न केला, “तू एकदा रेस्टॉरंटमध्ये ६४ चपात्या खाल्ल्या होत्या ही अफवा खरी आहे का?” यावर उत्तर देत जॉन म्हणाला, “हो, हे खरं आहे आणि जेव्हा मी हे केलं तेव्हा, वेटर आला आणि म्हणाला, अजून भात पण आहे.”
आणखी वाचा : या चित्रात तुम्ही सगळ्यात आधी काय पाहिले? यावरून कळेल तुमचे व्यक्तीमत्त्व
‘अटॅक’ या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्य राज आनंद यांनी केले आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात जॅकलीन फर्नांडिस, रकुल प्रीत सिंग, प्रकाश राज आणि रत्ना पाठक शाह यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.