बॉलिवूडमध्ये काहीवर्षांपूर्वी जॉन अब्राहम आणि बिपाशा बसू यांच्यातील प्रेमसंबंधांची चवीचवीने चर्चा केली जायची. या दोघांमधील लिव्ह इन रिलेशनशीपही गॉसिपचा विषय झाला होता. पण दोघांमध्ये ब्रेकअप झाल्यानंतर निर्माण झालेला दुरावा काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही. बिपाशा येत्या ३० एप्रिलला करणसिंग ग्रोव्हरसोबत लग्नाच्या बेडीत अडकत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत रविवारी संध्याकाळी एका कार्यक्रमात बिपाशाबद्दल प्रश्न विचारण्यात आल्यावर जॉनने हातातील माईक टाकून पटकन तिथून निघून जाणेच पसंद केले. बिपाशाला तिच्या आयुष्यातील नव्या सुरुवातीबद्दल शुभेच्छा देण्यात जॉनला काहीही रस नसल्याचेच या निमित्ताने दिसून आले.
काही वर्षांपूर्वी जॉन आणि बिपाशा कायम एकमेकांसोबत असायचे. त्यांच्यातील नातेसंबंधांबद्दल खूप चर्चाही व्हायची. पण अज्ञात कारणामुळे दोघांमध्ये ब्रेकअप झाल्यानंतर या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. तेव्हापासून हे दोघेही एकमेकांशी बोलत नाही. त्याचबरोबर एकमेकांबद्दलही कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत. लग्नासाठी निमंत्रितांच्या यादीतून बिपाशानेही जॉनच्या नावावर काट मारलीये. त्यामुळे सध्यातरी या दोघांमधील बिघडलेले संबंध सुरळीत होण्याची शक्यता नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा