बाईक प्रेमासाठी प्रसिद्ध असलेल्या जॉन अब्राहमने काही दिवसांपूर्वी  दिग्दर्शक संजय गुप्ताला एक बाईक भेट दिली होती. आता जॉनने त्याच्याकडे असलेल्या बाईकच्या कलेक्शनमध्ये यामाहा वायझेडएफ आर१ या बाईकचा समावेश केलाय.  ९९८ सीसी, लिक्वीड-कुल्ड, १६- टायटॅनियम व्हॉल्व, डीओएचसी, क्रॉसप्लेन क्रॅंकशाफ्टसह इन-लाईन फोर सिलिंडर इंजिन अशी या बाईकची काही खास वैशिष्ट्ये आहेत. मॅट फिनिश काळ्या रंगाच्या या बाईकमध्ये मशीन आणि वोगाचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. ट्रॅक्शन कंट्रोलसह येणारे हे एक लिमिटेड एडिशन अत्याधुनिक मॉडेल असून खास जॉनसाठी कस्टमाईज् केलेले आहे.

Story img Loader