‘ढिशूम’ या चित्रपटातील भूमिकेमुळे अभिनेता जॉन अब्राहम सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाच्या यशानंतर जॉन ‘एम. एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून हजेरी लावणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत होती. पण, यापैकी कोणत्याही बातमीला दुजोरा न देत, जॉनने आपण या चित्रपटात कोणतीही भूमिका करणार नसल्याचे सांगितले आहे. नीरज पांडे यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या ‘महेंद्र सिंग धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटामध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिका साकारणार असून या चित्रपटात अनुपम खेर, भूमिका चावला हे सहकलाकारही झळकणार आहेत.
‘ढिशूम’च्या यशानंतर चित्रपटसृष्टीत पुन्हा सक्रिय झालेला जॉन अब्राहम ‘फोर्स २’ या चित्रपटातून एसीपी यशवर्धनची व्यक्तिरेखा साकारण्याच्या तयारीत व्यस्त झाल्याचे वृत्त हाती येत आहे. पण, त्याव्यतिरिक्त इतर कोणताही चित्रपट अद्याप जॉनच्या वाट्याला आलेला नाही. सध्या जॉन अब्राहम चित्रपट निर्मिती क्षेत्रात जास्त लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. दमदार कथानकांच्या चित्रपटांना प्राधान्य देत जॉनने आजवर त्याच्या ‘जेए’ निर्मितीअंतर्गत ‘मद्रास कॅफे’ (२०१३), ‘रॉकी हॅम्डसम’ (२०१६) आणि ‘फोर्स २’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. वेगळ्या कथानकांना प्रेक्षकांसमोर प्रभावीपणे मांडणारा जॉन आता लवकरच एका मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. अंतर्गत सुत्रांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार जॉन दोन मराठी चित्रपटांची निर्मिती करणार असून याविषयी त्याने काही दिग्दर्शकांशी चर्चा केली असल्याचे कळते. स्थानिक भाषांमधल्या चित्रपटांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जॉन उत्सुक असला तरी, प्रादेशिक चित्रपटाच्या निर्मितीबाबतची माहिती करुन घेतल्यानंतर जॉन ही उडी घेणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा