बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. जॉन सध्या त्याच्या ‘अटॅक’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच, एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे जॉन चर्चेत आला आहे. ‘पुष्पा: द राइज’ आणि ‘आरआरआर’ सारख्या दक्षिण भारतीय चित्रपटांनी सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पण या सगळ्या जॉनने स्पष्ट केले, की बॉलिवुडमधील इतर अनेक कलाकारांप्रमाणे तो केवळ या व्यवसायात टिकून राहण्यासाठी रीजनल सिनेमाचा भाग बनणार नाही.
काही दिवसांपासून अशी बातमी आली होती की, जॉन देखील दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तो एका तेलगू चित्रपटाचा भाग बनणार आहे. ‘इंडिया डॉट कॉम’शी बोलताना जॉन म्हणाला, “मी कधीच रीजनल सिनेमा करणार नाही. मी हिंदी चित्रपटाचा हीरो आहे. फक्त चित्रपटाचा भाग होण्यासाठी मी कधीही सेकंड लीडची भूमिका करणार नाही. फक्त व्यवसायात टिकून राहण्यासाठी मी इतर कलाकारांप्रमाणे रीजलन चित्रपटांचा भाग कधीच बनणार नाही.”
आणखी वाचा : “बॉलिवूडमध्ये एकतरी काळी अभिनेत्री दाखवा…”, नवाजुद्दीन सिद्दीकीने केलेले वक्तव्य चर्चेत
जॉन प्रभास स्टारर तेलगू चित्रपट ‘सालार’मध्ये दिसणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. जॉनने ज्या कलाकारांकडे निशाना साधला आहे, त्यात अजय देवगण, आलिया भट्ट आणि सलमान खान सारख्या कलाकारांची नावे आहेत. दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या ‘RRR’मध्ये अजय आणि आलिया छोट्या भूमिकांमध्ये दिसले आहेत. त्याचबरोबर सलमान खान लवकरच मेगास्टार चिरंजीवींच्या ‘गॉडफादर’ या चित्रपटात खास भूमिका करताना दिसणार आहे. अलीकडेच सलमान खान म्हणाला, “मला आश्चर्य वाटते की, दक्षिणेत आमचे चित्रपट चांगले का चालत नाहीत, तर त्यांचे चित्रपट आमच्या इथे चांगली कमाई करत आहेत.”