जॉन हा फिटनेस नाहीतर त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. आता जी नवी चर्चा आहे ती जॉनच्या नव्या गाण्याची. ‘ वेलकम बॅक ‘ या चित्रपटासाठी एका गाण्याचे चित्रिकरण नुकतच पार पडले आहे. या गाण्यासाठी तब्बल तीन कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईतल्या एका प्रसिद्ध स्टुडिओत या गाण्याचे शूटींग करण्यात आले. जॉनबरोबर गाण्यात भोजपुरी नायिका संभावना सेठही थिरकताना दिसणार असून, यात ७०० ज्युनिअर आर्टिस्टचा ताफा वापरण्यात आला आहे. या गाण्यासाठी अनू मलिकने एक वेगळी धून बनवल्याचेही सांगण्यात येत आहे.  तीन कोटींचा बजेट असणा-या या गाण्याचे चित्रिकरण सात दिवस सुरू होते. फिरोज नाडियदवालाच्या ‘वेलकम बॅक’मध्ये जॉनबरोबर श्रुती हसन, नाना पाटेकर, अनिल कपूर आणि परेश रावल यांच्याही मुख्य भूमिका आहेत. २००७साली प्रदर्शित झालेल्या ‘वेलकम’ चित्रपटाचा ‘वेलकम बॅक’ हा सिक्वल आहे.
(छाया सौजन्यः फेसबुक)

Story img Loader