‘कपिल शर्मा शो’ हा टिव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो मानला जातो. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी आपल्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी या शोच्या मंचावर हजेरी लावतात. प्रेक्षकही या गोष्टी खूप एन्जॉय करतात. सध्या अभिनेता जॉन अब्राहम देखील त्याच्या आगमी चित्रपट ‘अ‍ॅटॅक’चं जोरदार प्रमोशन करत आहे. अशाच एका प्रमोशन इव्हेंटमध्ये ‘द कपिल शर्मा शो’बद्दल धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

ट्राइड आणि रिफ्युज प्रॉडक्शनच्या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत जॉन अब्राहमनं त्याच्या आतापर्यंतच्या बॉलिवूड प्रवासावर दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी ‘द कश्मीर फाइल्स’चं उदाहरण देताना तो म्हणाला, ‘बऱ्याच लोकांना वाटतं की, ‘कपिल शर्मा शो’मध्ये चित्रपट प्रमोशन केल्यानं तिकिटं विकली जातात. पण असं नाहीये. ‘द कश्मीर फाइल्स’ याचं उत्तम उदाहरण आहे. तुम्ही पाहू शकता या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर किती चांगली कमाई केली आहे.’ जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुरता आपटला होता.

आणखी वाचा- महाराष्ट्राचं दुर्दैव! प्रवीण तांबेचा चित्रपट तमिळ- तेलुगू भाषेत… पण मराठीत नाही

दरम्यान या आधी ‘द कश्मीर फाइल्स’वर प्रश्न विचारल्यानं जॉन अब्राहम एक पत्रकारावर चिडलेला पाहायला मिळाला होता. एवढंच नाही तर त्यानं त्या पत्रकाराला मूर्ख असं देखील म्हटलं होतं. ‘द कश्मीर फाइल्स’वर प्रतिक्रिया देताना त्यानं, ‘मी हा चित्रपट पाहिलेला नाही. त्यामुळे त्यावर मी बोलणार नाही.’ असं म्हटलं होतं. याशिवाय या कार्यक्रमात फक्त ‘अ‍ॅटॅक’ चित्रपटाविषयीच प्रश्न विचारावेत असंही त्यानं यावेळी म्हटलं होतं.

Story img Loader